पाटोदा ग्रामिण रूग्णालयात ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यात यावे, राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले वैद्यकीय अधिकारी,कर्मचा-यांनाच पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक भरती नाही, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री,स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्र्यांना निवेदन :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -

पाटोदा ग्रामिण रूग्णालयात ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यात यावे, राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीमुळे  अपघातांचे प्रमाण वाढले
वैद्यकीय अधिकारी,कर्मचा-यांनाच पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक भरती नाही, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री,स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्र्यांना निवेदन :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
------------------------------------------------ (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) मांजरसुंभा ते पाटोदा नविन राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रस्ता झाल्यामुळे याठीकाणी वाहतूक वाढली असुन त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे पाटोदा ग्रामिण रूग्णालयात ट्रामा केअर सेंटरची स्थापना करण्यात यावी,त्याच बरोबर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक, सोनोग्राफी मशिन, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना पिण्याचे शुद्ध पाणी आदि.मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातुर, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना दिले आहे.


ट्रामा केअर सेंटरची स्थापना करण्यात यावी, अपघाताचे प्रमाण वाढले
----------------------------------------------
 गेल्या वर्षभरापासून मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग ५४८-ड या सिमेंट रस्त्याचे काम पुर्णत्वास येत आहे तसतसे या महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे.त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, वर्षभरात ५५ हुन जास्त अपघाताची नोंद असुन त्यापैकी ३० जण मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे.  अपघात झाल्यानंतर जखमीला  बीड अथवा नगरला जावे लागते,तेवढ्या वेळात त्यांना अत्यावश्यक सुविधेअभावी प्राण गमवावे लागतात. पाटोदा तालुक्यातील लोकसंख्येचा विचार करता ग्रामिण रूग्णालय पाटोदा येथे ट्रामा केअर सेंटरची स्थापना करणे अत्यावश्यक आहे
.सोनोग्राफी मशिन उपलब्ध करून देण्यात यावे व त्यासाठी रेडिओलाजिस्टचे आयपीएस मध्ये पद निर्माण करून भरती करावी.
   वरील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड आणि उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातुर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उदृधवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना निवेदन देण्यात आले आहे.


  कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक पदासह    रिक्त पदे भरण्यात यावी
----------------------------------------------- पाटोदा ग्रामिण रूग्णालय कायमच प्रभारी अधिक्षक पदावर अवलंबून राहीले आहे, त्याऐवजी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक पद भरण्यात यावे त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक, वर्ग-४ ची पदे सुद्धा भरण्यात यावीत.



वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना पिण्याचे पाणी जारचे विकत घ्यावे लागते, कायमस्वरूपी व्यवस्था करावी
----------------------------------------------- दि. ११/०३/२०१६ रोजी ग्रामिण रूग्णालयातील पाणीटंचाई, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानी पिण्याच्या पाण्याची असुविधा याविषयी निवेदन दिले होते,त्यानंतर दि. १६/०३/२०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय (पाणी टंचाई विभाग) बीड यांनी जा.क्र.२०१६/मशाका/कक्ष-३/पिपाटं/कावी-९८९ व्दारे संबंधित विभागाला आदेश देऊन पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी यासाठी आदेश दिले होते.
दि. १०/०५/२०१९ रोजी डॉ.शेलार हरिदास यांनी एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार करून रूग्णालयातील असुविधा विषयी तक्रार केली होती, याविषयी दि. ३०/१२/२०१९ रोजी  डॉ.एकनाथ माले , उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातुर व डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांना डॉ.नितीन अंबाडेकर यांनी लेखी पत्रकाद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे कळवले असुन देखील आज दि. ३१ जुलै २०२० पर्यत मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे तात्काळ ग्रामिण रुग्णालयासाठी आणि रूग्णालयातील अधिकारी,व ईतर कर्मचा-यांच्या निवासस्थानी पाण्याची कायम स्वरुपी व्यवस्था उदा. पाण्याची टाकी,नळफिटींग, बोअरवेल आदि.व्यवस्था करण्यात यावी.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर व डॉ. हरिदास शेलार,दासखेडकर यांनी दिला आहे.