(मुंबई,दि.१७ - मुंबईत येथील आंबेडकर भवन या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला बेस्ट तसेच एसटी महामंडळाच्या युनियनचे कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करावी तसेच मंदिरे खुली करण्यासाठी सर्व साधुसंतांना पाठिंबा देण्यात येईल, अशी माहिती ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले एसटी महामंडळ व बेस्ट कर्मचाऱ्यांची एक बैठक आज घेण्यात आली होती. बेस्ट शंभर टक्के चालू आहे. ही बातमी खोटी आहे ज्या लहान बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्या पूर्ण चालू आहेत. तर बेस्ट मालकीच्या केवळ १५ टक्के बस चालू आहेत. काँट्रॅक्टदाराच्या बस चालू असल्यामुळे बेस्टचा तोटा होत आहे. याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. एसटी महामंडळ हे खाजगी करणाच्या मार्गावर आहेत. याच बरोबर एसटी महामंडळामध्ये वाहक चालकांच्या नोकऱ्या आता धोक्यात आहेत. त्याबाबत कामगारांना आम्ही काही सूचना केलेल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही एक दिवस गाड्या बाहेर काढण्यासाठी हजर रहा. गाड्या जास्त दिवस आतमध्ये बंद राहिल्या की खराब होतात. राज्यात आंतरराज्य जिल्हा बंदी आहे. ही जिल्हाबंदी हटवावी आणि नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी. मुख्यमंत्री याना आवाहन आहे की माझे निर्देश घटनेसारखे वाटत असेल तर त्याचे पालन करावे. लोकांचे दळणवळण चालू व्हावे. त्याबाबत घोषणा करण्यात यावी.
दिल्लीत केवळ मेट्रो बंद आहेत,मात्र इतर सर्व वाहतूक चालू आहे तर उत्तर प्रदेश मध्येही वाहतूक सेवा चालू आहेत. मग या बाबतीत महाराष्ट्र मागासलेला, ओला दाखवू नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केली आहे. लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आम्ही आंदोलन करु असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
मंदिर चालू करावे यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता-
मी स्वतः अकोल्यातील मंदिर खुले करून आलो आहे. आता त्या ठिकाणी कावड ही निघाली आहे. तिथे कोरोनाचे एकही रुग्ण निघाला नाही. साधू संतांची जी मागणी आहे ती सरकारने मान्य करावी.पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत त्यांना मी शब्द दिला आहे मी देखील तुमच्या सोबत आंदोलनाला उतरणार आहे.
पार्थ पवार बाबत विचारल्यावर भाजपची स्तुती करण्याचं विधान केले त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणतात.
पहिलं अजित पवारांना फटकारले आता पार्थला यात काही तरी गौडबंगाल असल्याचे ही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले.