पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर सर यांच्या माध्यमातून मुख्य अभियंता कार्यकारी (निर्माण) सेंटर रेल्वे ,कार्यालय पनवेल येथे दिनांक १०/०८ /२०२० रोजी तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्गात साचलेले पाणी काढणे व रेल्वे फाटकाजवळील पक्का रस्ता बनवण्याकरिता अर्ज दिला होता त्यामध्ये त्यांना दहा दिवसांच्या मुदतीत जर हि कामे केली नाहीत तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याबाबतचे पत्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांनाही देण्यात आले होते. अदितीताईंकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार आज या मागणीला यश आले आहे.आणि त्यानुसार आज कार्यकारी अभियंता श्री.अशोक गुणगावकर व अभियंता श्री.एस.निंबेकर यांनी सदर जागेवर नेऊन आपण दिलेल्या पत्रातील मागणीनुसार कामाची सुरुवात केल्याची माहिती दिली. त्यामध्ये भुयारी मार्गातील पाणी काढण्यात आले . व भुयारी मार्गाजवळील रस्त्यावर खडी टाकून कामाची सुरुवात केली. तसेच लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. सदर कामामुळे तळोजा फेज १च्या नागरिकांना या समस्येपासून दिलासा मिळेल.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.कु.अदितीताईंनी तटकरे यांनी जनहित लक्षात घेता हे काम मार्गी लावल्याबद्दल राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग व तळोजा रहिवासियांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रसंगी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री.किशोर देवधेकर सर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फारूख पटेल, राष्ट्रवादी सामाजिक न्यायचे जिल्हा सचिव अफरोज शेख, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष शेहबाज पटेल, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा सचिव श्री.गणेश पाटील, प्रभाग ३ उपाध्यक्ष हरिस शेख,सचिव अख्तर शेख,ईम्रान आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.