(बीड प्रतिनिधी)बीड तालुक्यातील चौसाळा ग्रामपंचायत ही तालुक्यात सर्वात मोठी असुन सध्दपरिस्थीत दलीत वस्तीतील पथदिवे हे बंद अवस्थेत असुन याकडे ग्रामपंचायत कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे
याबाबत सविस्त्तर वृत्त असे की,जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडुन दलीत वस्तीसाठी सौर उर्जेचे पथदिवे बसविण्यात आलेले आहेत हे पथदिवे बसवित असताना एकाच ठिकाणी तीन तीन पथदिवे बसविल्याचा महाप्रताप चौसाळा ग्रामपंचायतने केला आहे राजकिय हस्त्कक्षेपामुळे ज्या ठिकाणी खर्या अर्थाने या पथदिव्याची गरज होती त्या ठिकाणी न बसवता राजकिय पुढारयांच्या घरासमोर तीन तीन पथदिवे बसविले असुन या पथदिव्यासाठी आलेल्या निधीत अफरा तफर झाली असल्याचे बोलले जात आहे