पनवेल : बँकिंग उद्योगात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्टच्या नवी मुंबई अंचलचा श्री मिलिंद घारड यांनी नुकताच पदभार सांभाळला.
श्री मिलिंद घारड हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी बी.एस.सी., एम.बी.ए. मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची नुकतीच उप महाप्रबंधक पदी पदोन्नती होऊन ते नवी मुंबई अंचल, वाशी येथे झोनल मॅनेजर म्हणून रुजू झाले आहेत.
त्यांना बँकिंग क्षेत्रात प्रदीर्घ असा अनुभव असून ह्या अगोदर बँकेच्या प्रधान कार्यालय, पुणे येथून आपल्या बँकिंग करिअरची विपणन अधिकारी म्हणून त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी ह्या अगोदर दिल्ली, पुणे व अमरावती येथे बँकेच्या विविध महत्वपूर्ण विभागात आणि शाखा प्रबंधक म्हणून यशश्वी कामगिरी पार पडली आहे.
बँकेने त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केल्या बद्दल त्यांना उत्कृष्टता प्रमाणपत्र देऊन बँकेने नुकतेच गौरविले आहे.
बँकेला विश्वास आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई झोन अंतर्गत ४४ शाखांमध्ये त्यांची उत्कृष्ट कामगिरी राहणार आहे. त्यांनी पदभार सांभाळल्या बद्दल बँकेच्या नवी मुंबई अंचल मध्ये व रायगड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन सर्वत्र आनंद व्यक्त होऊन आत्मविश्वास निर्माण झाला आहे. श्री मिलिंद घारड यांनी समूह भावना व सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नवी मुंबई झोन नक्कीच आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करून बँकेला प्रगती पथावर नेईल असा विश्वास व्यक्त केला आहे. श्री मिलिंद घारड यांनी पदभार सांभाळल्या बद्दल उप अंचल प्रबंधक, श्री राजेंद्र बोरसे व सहाय्यक महाप्रबंधक,श्री पराग अभ्यंकर यांनी त्यांचे हार्दिक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.