जाचक असलेली संचार बंदी हटवुन कुंभार समाजाला मूर्ती विक्रीसाठी परवानगी द्या-प्रा.शिवराज बांगर 

जाचक असलेली संचार बंदी हटवुन कुंभार समाजाला मूर्ती विक्रीसाठी परवानगी द्या-प्रा.शिवराज बांगर 


(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, केज, आष्टी, आंबेजोगाई शहर अचानक लॉकडाऊन केली आहे, 21 तारखेपर्यंत हे  असल्याने या कालावधीमध्ये येणारे पोळा, गणपती, गौरी उत्सव यासाठी लागणाऱ्या मातीच्या मूर्ती कुंभार समाजाने वर्षभर बनवलेला असतात. कुंभार समाज कर्ज काढून वर्षभर या मूर्ती बनवत असतो, आणि त्या मूर्ती विक्रीसाठी फक्त हाच एकमेव आठवडा त्यांना मिळतो, जर लॉकडाऊन उघडलं नाही, तर या मूर्ती घरामध्ये पडून राहतील! पुन्हा वर्षभर या मूर्तींची विक्री होणार नाही. त्यामुळे कुंभार समाज हा कर्जबाजारी होईल अश्या  प्रकारची भीती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे.  म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांना निवेदन  देण्यात आले. जाचक असलेले लाॅकडाऊन उठवले नाही आणि मूर्ती विक्रीसाठी परवानगी दिली नाही तर!  वंचित बहुजन आघाडी दोन दिवसांमध्ये रस्त्यावर उतरेल असा इशारा  देण्यात आला. याप्रसंगी कुंभार समाजाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव भीमराव दळे  उमेश तुळवे, सुमित उजगरे, व कुंभार समाजाचे गौतम चित्रे उपस्थित होते.