चौसाळा येथे स्वस्त धान्य दुकानदार करतायेत प्रंधानमंत्री मोफत धान्य वाटपाचा काळाबाजार--विवेक कुचेकर



"माहे जुलै 2020 धान्य केले गायब"



(बीड प्रतिनिधी)बीड जिल्हा पुरवठा अधीकारी  सचिन खाडे    यांनी माहे ऑगस्ट 2020 करिता दर वाटप केलेले आहे परंतु एकसोबत जुलै 2020 महिन्याचे धान्य सुद्धा ऑगस्ट महिन्यात वितरित केले जाणार  आहे pmgkay माहे जुलै2020या महिन्याचे धान्य सुद्धा माहे ऑगस्ट या महिन्यातच वितरित केले जाणार आहे असा लेखी  आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सचिन खाडे यांनी काढला असतानादेखील बीड तालुक्यातील चौसाळा येथील शासनमान्य चार स्वस्त धान्य दुकान असतानादेखील जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असल्याचे चित्र चौसाळा शहरात दिसत आहे ऐन गौरी ,गणपती व पोळा व  तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर  गोरगरिबांच्या तोंडातील घास हिसकवण्याचे महापाप  चौसाळा येथील स्वस्त धान्य दुकानदार करताना दिसत आहेत याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी व बीड तहसीलदार साहेब  लक्ष देणार का असा संतप्त सवाल चौसाळा येथील सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे 



,,चौसाळा येथील स्वस्त धान्य दुकानदार हे राशन चा आलेला माल हे गोरगरीबांना न वाटता काळया बाजारात विक्री करत असुन राशनला येणारी साखर गेल्या तीन वर्षापासुन वाटप केलेली नसुन हे स्वस्त धान्य दुकानदार पावती देण्यासही टाळाटाळ करत असुन सणासुदीच्या काळातच गोरगरीबाना मोफत येणारे धान्य काळ्या बाजारात विकत असल्यामुळे याची तात्काळ चौकशी करून दोषी दुकानाचा परवाना निलबींत करण्यात यावा नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा,शिवराज बांगर पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्रीव स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी



विवेक कुचेकर


वंचित बहुजन आघाडी बीड तालुका