------------------------------------------------ ( बीड प्रतिनिधी --विवेक कुचेकर)पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथिल वृद्ध व्यक्ती ८ आगस्ट रोजी कोव्हीड जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा स्वाब घेऊन दाखल करुन घेण्याऐवजी घरी पाठवला त्याचा ९ आगस्ट रोजी घरी मृत्यू झाला.१० आगस्ट रोजी त्याचा स्वाब रिपोर्ट कोरोना पाझिटीव्ह आला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील सर्वस्वी जबाबदार डॉ.अशोक थोरात असुन त्यांच्यावर याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांना डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांनी केली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- पाटोदा तालुक्यातील मौजे डोंगरकिंन्ही येथिल वृद्ध व्यक्ती ८ आगस्ट २०२० शनिवार रोजी आरोग्य केंद्रात गेला, त्याला येथिल वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून आक्सिजन कमी असल्याचा उल्लेख रेफर लेटरवर करत तात्काळ जिल्हा रुग्णालयात पाठवले. येथिल वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचा केवळ स्वाब घेतला आणि नंतर दवाखान्यात दाखल करून न घेता घरी पाठवले,त्याचा दि. ९ आगस्ट २०२० रविवार रोजी मृत्यू झाला,१० आगस्ट रोजी त्याचा अहवाल कोरोना पाझिटीव्ह आला. यामुळे जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील या गलथान अनागोंदी कारभाराला जबाबदार डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आरोग्य विभागाला कोरोना आजारासंबधात विशेष उपाययोजना म्हणुन दिल्या गेलेल्या निधी खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असुन त्याची स्वतंत्ररीत्या कमिटीची स्थापना करण्यात यावी आणि चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांनी आयुक्त आरोग्यसेवा संचालनालय मुंबई यांना लेखी तक्रार केली आहे.