(बीड प्रतिनिधी)भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे मात्र दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली आहे राज्यघटने प्रमाणे संविधान व भारत धर्मनिरपेक्ष आहे धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नसुन कायधाने सुध्दा चुकिचे आहे असे असताना संविधान गणपतीचा पाठ समजुन दिग्दर्शक प्रविण तरडे यानी भारतीय संविधानाचा वापर केला आहे त्यामुळे समस्त संविधान प्रेमीच्या भावना दुखवल्या असुन त्यामुळे देशात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही त्यामुळे प्रविण तरडे याच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्रीव स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रचारक विवेक कुचेकर यानी दिला आहे