संपूर्ण इमारत सील न करण्याच्या प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश, महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यपद्धतीबाबत सुधारित निर्देश

संपूर्ण इमारत सील न करण्याच्या प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश, महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यपद्धतीबाबत सुधारित निर्देश


नवीन पनवेल : पनवेलमध्ये जी व्यक्ती कोरोना पॉझिटिव येईल अशा व्यक्तीचे ज्या इमारतीत घर आहे ती इमारत सील करण्यात येत होती. त्या व्यक्तीमध्ये जर का गंभीर लक्षण नसतील तर त्या व्यक्तीला होम कॉरांटाइन सुद्धा करण्यात येत होते किंवा तशी व्यवस्था नसेल तर त्या व्यक्तीला इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवण्यात येते अशी सध्याची पनवेल महानगरपालिकेची पद्धत आहे. अशावेळी ही संपूर्ण इमारत आणि पेशंटचे घर सेनेटाईस करून फक्त त्या पेशंटचे राहते घर महानगरपालिकेकडून सील करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यातर्फे करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून पनवेल महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यपद्धतीबाबत सुधारित निर्देश देण्यात आले आहेत. 
           कोरोना पेशंट पॉझिटिव्ह होऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला असतानासुद्धा त्याच्या चार दिवसानंतर पनवेल महानगर पालिकेच्या  प्रेसनोट मध्ये ती व्यक्ती पॉजीटिव म्हणून दाखविले जाते व दोन ते तीन दिवसांनी ती व्यक्ती राहत असलेली इमारत सील केली जाते. याबाबत विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या. पेशंटचा रिपोर्ट आणि इमारत सील करण्याचा कालावधी यामध्ये बराच अंतर आहे. या अंतराने बिल्डिंग सील करून कोणतेही उद्दिष्ट साध्य होत नाही. उलट इमारतीमधील नागरिकांना त्याचा नाहक त्रास होतो. ही गोष्ट विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती.


             पनवेल महानगरपालिकेला पॉझिटिव्ह व्यक्तीची माहिती मिळाल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव व्यक्ती एक तर होमकॉरांटाइन होते तशी व्यवस्था नसल्यास विलगीकरण केंद्रामध्ये दाखल होते किंवा जास्त गंभीर लक्षणे असल्यास रुग्णालयांमध्ये ऍडमिट होते. कोरोना हा रोग शिंकल्याने किंवा पेशंटचे संपर्कात आल्याने होतो. त्या पेशंटचा वावर इमारतीमध्ये सील केल्या नंतरच्या काळात पुढील दहा दिवस होत नसल्यामुळे अशावेळी ही संपूर्ण इमारत आणि पेशंटचे घर सॅनेटाईस करून फक्त त्या पेशंटचे राहते घर महानगरपालिकेकडून सील करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या करण्यात करण्यात आली होती. जेणेकरून संपूर्ण इमारत सील करून त्याचा नाहक त्रास इमारतीतील रहिवाशांना होऊ नये. प्रीतम म्हात्रे यांनी केलेल्या मागणीचा पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी त्वरित निर्णय घेतला असून पनवेल महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यपद्धतीबाबत सुधारित निर्देश दिले आहेत. त्याबद्दल त्यांचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडून आभार मानण्यात आले आहेत.


 


चौकट 


कोरोनामध्ये फक्त त्या पॉजीटिव व्यक्तीचे घर सील केले तर अशावेळी इमारतीतील इतर रहिवाशांकडून सुद्धा त्या घरातील इतर सदस्यांना आवश्यक त्या वस्तू पोहोचवणे तसे त्यांची काळजी घेणे हे सोयीस्कर पडते. परंतु  बिल्डिंग सील करण्याच्या पद्धती मध्ये जो हेतू आहे तो साध्य न होता विनाकारण संपूर्ण इमारतीमधील रहिवासी वेठीस धरले जात होते. महापालिकेच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. -  (प्रितम जनार्दन म्हात्रे, विरोधी पक्ष नेते,पनवेल महानगरपालिका)