हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कारवितरण समारंभ ऑनलाईन पद्धतीने संपन्न


पनवेल : नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा शिंपी समाजात प्रतिष्ठेचा समजला जाणारा “ हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार” वितरण समारंभ ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.


            १५ ऑगस्ट रोजी पनवेलचे सुपुत्र हिरवे गुरुजी हे गोवा मुक्तिसंग्रामात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र यांचे वतीने विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समस्त शिंपी समाजातील एका समाज रत्नास “हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण” या पुरस्काराने गौरविण्यात येते. इचलकरंजी येथील श्री. प्रसन्न वायचळ, अवकाश संशोधक, वैज्ञानिक यांना सन २०२० चा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शासकीय निर्बंध असल्याने १५ ऑगस्ट २०२० रोजी सदरचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरले. अचुक निर्धारित वेळेत दुपारी ४ वाजता ऑनलाईन सुरु झालेल्या ह्या पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन भोसरी, पुणे येथून सागर हिरवे यांनी केले. अॅड. सागर मांढरे यांनी पुणे येथून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. हु. हिरवे गुरुजी यांच्या मोठ्या सून श्रीमती अरुणा हिरवे तसेच नातसून सुरेखा हिरवे आणि हेमलता हिरवे यांनी हु. हिरवे गुरुजी आणि संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून पूजन केले आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. 


               पनवेलमधून हु. हिरवे गुरुजी यांचे नातु अॅड.नागेश हिरवे यांनी हु. हिरवे गुरुजी यांचे गोवा मुक्ती संग्रामातील महत्त्वपुर्ण योगदान याबाबत माहिती दिली. विरेश नांगरे यांनी संघटनेचे उद्दीष्ट व आजपर्यंतचे कार्य व युवक संघात काम करतांना मिळणारा आनंद थोडक्यात विषद केले. नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष  सिध्देश हिरवे यांनी शिक्रापूर येथून स्वात्ंत्र्याचे महत्व व क्रांतिकारक यांचे महान कार्य यांचे महत्व विशद करताना हु. हिरवे गुरुजी यांचे गोवा मुक्ती संग्रामातील महत्वाचे कार्य सांगितले. तसेच संत नामदेव महाराज यांचे भक्तीच्या माध्यमातून क्रांतिकारी कार्य निद्रिस्त समाज संत नामदेव महाराज यांनी जागा करुन पंजाब पर्यंत केलेले कार्य यांचे महत्त्व यांचा उल्लेख आपल्या भाषणात केला. पुढे पुरस्कारासाठी निवड केलेले वैज्ञानिक प्रसन्न वायचळ यांची पुरस्काराचे दृष्टीने केलेली सार्थ निवड यावर आपले मत मांडले. युवक संघाचे वतिने नुकताच राबवण्यात आलेला एक कुटुंब एक वृक्ष हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्य नियोजनाची भुमिका पार पाडणारे कपिल बगाडे यांचा ह्या वेळी सन्मान पत्राने गौरव करण्यात आले.


        ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भावी पदवीधर मतदार संघ उमेदवार धनंजय गोंदकर ह्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित होते. पुणे येतगून त्यांचेही मौलिक मार्गदर्शन ह्यावेळी लाभले अध्यक्षीय भाषण संत नामदेव महाराज यांचे वंशज ह. भ. प. निवृत्ती महाराज नामदास पंढरपूर हुन मार्गदर्शन करताना हु. हिरवे गुरुजी यांचे कार्य यावर विचार मांडले व सर्व कार्यकर्त्यांनी हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी जे पद्धतशीर नियोजन व प्रयत्न केले त्याबद्दल कौतुक केले. शिक्रापूर येथून निलेश काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


     सरतेशेवटी आपले मनोगत व्यक्त करताना इचलकरंजी येथून  प्रसन्न वायचळ यांना भरून आले, त्यांनी आयोजकांसह सर्वांचे आभार मानले. त्यानंतर सताऱ्याहुन मनिषा विजय ढवळे यांनी संत नामदेव महाराज यांचे पसायदान म्हटले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर पुरस्काराच्या ऑनलाईन प्रक्षेपणासाठी नवीन पनवेल येथून तांत्रिक बाजू पराग नागेश हिरवे आणि अनिकेत निलेश हिरवे यांनी यशस्वीपणे सांभाळली. अनेक मान्यवर, कार्यकर्ते व समाज बांधव संपूर्ण महाराष्ट्रातून ऑनलाईन उपस्थित होते. पुरस्कारासाठी केलेली योग्य निवड व नियोजन आजपर्यंत केलेले सामाजिक कार्यक्रम याबद्दल समाजातिल अनेक कार्यकर्त्यांनी फोन करुन पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले व पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.


Attachments area