(बीड प्रतिनिधी:- विवेक कुचेकर )सुधाकर नाईक यांच्या नाव ऐकताच अंडरवर्ल्ड डॉन यांना घाम सुटतो, महाराष्ट्रातील गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जल क्रांतीचे जनक सुधाकर रावजी नाईक साहेब यांना अजुन ही शिकारी राजा असे म्हटले जाते. सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला कुठेतरी खोडसाळपणा करण्याचे काम राज्य सरकार करत असून तरी तमाम बंजारा समाज असे कृत्य खपून घेणार नाही असे माहिती बंजारा पँथरचे अध्यक्ष रोहिदास पवार यांनी कळविले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने १२ जून २०२० रोजी परिपत्रक जाहीर करून महाराष्ट्रातील 'जलक्रांतीचे जनक' शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १४ जुलै रोजी 'जलभूषण पुरस्कार' प्रदान करण्याचे ठरवले आहे. मात्र, जलसंधारणाचे खरे कार्य माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारने १० मे हा त्यांचा स्मृतिदिन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केलेला आहे. त्यांना 'जलक्रांतीचे प्रणेते' घोषित केल्यानंतर आता राज्य सरकारने 'जलक्रांतीचे जनक' म्हणून शंकरराव चव्हाण यांना घोषित करून त्यांच्या जन्मतिथीला जलभूषण पुरस्कार देण्याची रितसर कारवाई केल्याने सुधाकरराव नाईक यांच्या कार्यावर कुरघोडी केल्याची संतप्त भावना तमाम भटक्या-विमुक्त बंजारा तसेच त्यांच्या चाहत्यांनी समाजामध्ये व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक काढताना महाआघाडी सरकारमधील काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुधाकरराव नाईक यांचे जलक्रांतीचे अविस्मरणीय कार्याला डावलून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना 'जलक्रांतीचे जनक' हा सन्मान देण्यात आलेला आहे. सुधाकररावांनी जलसंधारणाच्या खात्याची महाराष्ट्रात पहिली सुरुवात केली. जलसंधारणाला राज्यात मोठी चालना दिली. राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्रात झंझावती दौरे करून भूजलपातळी वाढविण्यासाठी कार्यक्रम आखले.
जलसंधारणाचे कार्य झाले नाही तर भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होईल', असा इशारा सुधाकररावजी नाईक त्यांनी दिला.
आज सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या जलक्रांतीच्या कार्यावर बगल देऊन त्यांच्या कर्तृत्वावर अन्याय केला आहे,हा निर्णय लवकर च्या लवकर मागे घ्यावे अन्यथा बंजारा पँथर च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रोहिदास पवार यांनी दिला आहे.