स्थानिकांना विभागातच नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रितम म्हात्रे यांचा पुढाकार

स्थानिकांना विभागातच नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रितम म्हात्रे यांचा पुढाकार


पनवेल : शेतकरी कामगार पक्षातर्फे गेली अनेक वर्षे सातत्याने रायगड, नवी मुंबई विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकरीसंदर्भात विविध शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. तरुणांच्या रोजगार आणि स्वयंरोजगार संदर्भात covid-19 परिस्थितीमध्ये पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाला काही विषय सविस्तरपणे मांडले होते. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या रोजगार आणि स्वयंरोजगार संदर्भात काही ठोस पावले उचलण्यात आली आहेत.


          महाराष्ट्र शासनाच्या उदयोग संचालनालय अंतर्गत कार्यरत व ज़िल्हा उदयोग केंद्र रायगड येथे कार्यरत,"महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) रायगड", या कार्यालयातर्फे "COVID 19 "प्रादुर्भाव लक्षात घेऊन रायगड ज़िल्हा अंतर्गत कार्यरत सर्व औद्योगीक संघटनाच्या सहकार्याने त्यांच्या कार्यक्षेत्रात तांत्रिक / कार्यालयीन मनुष्यबळाची उपलब्धता करूनदेण्यासाठी काही 'Online training 'ची संकल्पना MCED तर्फे करण्यात येणार असून त्याकरिता पनवेल कार्यक्षेत्रातील विविध उद्योग घटकांना कोणकोणत्या कार्यक्षेत्रात तांत्रिक प्रशिक्षित अथवा संगणक प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहेत. त्याबद्दलची माहिती MCED या महाराष्ट्र राज्य सरकारच्या विभागाला द्यावी अशा आशयाचे पत्र पनवेलमधील विविध कंपन्यांना दिले आहे.


            त्यात प्रीतम म्हात्रे यांनी MCED मार्फत प्राप्त माहिती आधारे ते विविध प्रकारचे ट्रेनिंग आयोजित करून तरुणांना तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन करून सदर तरुणांची माहिती पुन्हा कंपन्यांना नोकरीसाठी पुरवण्यात येईल, जेणेकरून या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यामुळे कंपन्यांना आवश्यक ते सक्षम मनुष्यबळ त्याच विभागात निर्माण होईल व पनवेल विभागात रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. यासाठी कंपन्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची माहिती (ज़िल्हा प्रकल्प अधिकारी, MCED,रायगड) 7774053014 raigadpomced@gmail.com यांना कळवावी. त्यांचे आवश्यक असेल तेव्हा वरील विषयात मार्गदर्शन कंपन्यांना मिळेल. असं आवाहन विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी कंपन्यांना केले आहे.


 


कोट               


"लॉंक डाऊनच्या काळात कंपन्यांमधील कामगार आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर त्या कामगारांची आवश्यकता त्या कंपन्यांना जाणवेल. अशावेळी त्या विभागातील लोकांना रोजगार मिळू शकेल या अनुषंगाने मे महिन्यांमध्ये मी राज्य सरकारला पत्राद्वारे उपाययोजना करण्याची विनंती केली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत MCED मार्फत राज्य सरकारने उपक्रम सुरू केला आहे, त्याला पनवेल, रायगडमधील सर्व कंपन्यांनी आवश्यक ती माहिती देऊन स्थानिकांना त्यांच्याच विभागात रोजगारनिर्मिती होण्यास सहकार्य करावे.-  प्रितम जनार्दन म्हात्रे (विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका)


Attachments area