अशोक हिंगे पाटील यांची वंचित बहुजन आघाडी च्या मराठवाडा
अध्यक्ष पदी निवड
( बीड प्रतिनिधी --विवेक कुचेकर) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने राज्य कार्यकारिणी च्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत चर्चेअंती मराठवाडा विभागीय कार्यकारिणी निवडण्यात आली
निवडीमध्ये विशेषता अशी आहे की यामध्ये मराठा बौद्ध धनगर मुस्लिम अल्पसंख्याक भटके-विमुक्त आदिवासी वडार कैकाडी अशा सर्वसमावेशक जातीची निवड केलेली दिसत आहे किंवा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजेच सोशल इंजिनीअरिंगचा वापर यामध्ये केलेला दिसत आहे मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता या निवडीचे विशेष महत्त्व आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी च्या मराठवाड्याचे अध्यक्षपदी बीड विधानसभेचे उमेदवार ता मराठा क्रांती मोर्चा चे जिल्हा समन्वयक समितीचे अशोक हिंगे पाटील यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे संपूर्ण मराठवाड्यात संघटनात्मक पक्षबांधणी पक्ष मोठा करण्याची जबाबदारी विभागीय कमिटीवर असणार आहे या निवडीमुळे वंचित बहुजन आघाडीत आनंदाचे वातावरण आहे