माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत 124 रुग्णाची अॅटीजन तपासनी तर 21 पॉझिटिव्ह :- डाॅ. ए.बी. मंचुके "


 (चौसाळा प्रतिनिधी--विवेक कुचेकर) दिनांक 17 सप्टेंबर 2020 ते 24 सप्टेंबर 2020 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा येथे 124 संशयित रुग्णांची अॅटीजन तपासणी केली पैकी 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी कोविड सेंटर मध्ये पाठवून रोगप्रसाराला काही अंशी तरी आळा बसवण्याचे काम केले असून 1246 कोमाॅर्बिड (Co-Morbid ) रुग्णाची तपासणी केली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अंकुश मंचुके यांनी सांगितले.
 सध्या ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण वाढते चाल्याचे दिसून येते . याचे मुख्य दोन कारणे अशिक्षित अज्ञानीपणा तर दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे  सुशिक्षित बेपरवाह वर्ग होय. ज्यांना आरोग्य कर्मचाऱ्या इतकेच जवळपास शास्त्रीय ज्ञान असल्याचे निदर्शनास येते जसे Social Distancing ,N95 Mask ,Thermal Gun, Pulse oximeter   किंबहुना तपासणीचे साधने Antigen -Test , RT -PCR , HRCT Score  इत्यादी बऱ्यापैकी माहीत असून या ज्ञानाचा वापर ते मी  इतरांपेक्षा वेगळा व किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी करत असून आचरण शुन्य आहे.
सध्या बँक ,सार्वजनिक ठिकाण किंबहुना काही हॉस्पिटलच्या समोर Thermal Gun व्दवारे वॉचमन तपासणी करत आहे असे दिसून येत आहे.  हे अतिशय कुचकामी असून ऑक्सीजन लेवल (Oxygen Level ) तपासली तर त्याचा काही अंशी निश्चित फायदाच होईल.'Happy Hypoxia'  या मध्ये रुग्णाला फारसा त्रास जाणवत नाही. परंतु त्याचा Spo2 70% पेक्षा कमी असतो अशा रुग्णांना 24 ते 48 तासात Oxygen सह योग्य उपचार न मिळाल्यास धोका होऊ शकतो. या साठी प्रत्येक Co- Morbid  तसेच ज्यांना थोड्याश्या चालल्यानंतर दम लागत असेल अशांनी प्रत्येक गावांमध्ये आशा स्वयंसेविके कडे Pulse -Oximeter  उपलब्ध आहे. त्यांच्याकडे तपासणी करावी असे आव्हान डॉ. मंचुके करत आहेत.
तसेच या पुर्वी  मा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषद सदस्य श्री अशोक लोढा ,सरपंच मधुकर तोडकर , लोकनेते विलास महाराज शिंदे यांच्या सहकार्याने व डाॅ.अंकुश मंचुके व डॉ. कैलास खाकरे यांच्या योग्य नियोजनाने दिनांक 14 व 15 सप्टेंबर 2020 रोजी चौसाळा येथील व्यापाऱ्यांसह परिसरातील इतर संशयित असे 740 Antigen Test करण्यात आल्या पैकी 31 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यांना तात्काळ Covid Centre मध्ये पाठवून त्यांच्या सहवासीतांची तपासणी करण्यात आली.
 चौसाळा गावातील काही खाजगी वैद्यकीय व्यवसायिक Covid -Positive  आल्यामुळे त्यांच्यामध्ये रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्याचे प्रमाण अतिशय वाढले असून. काळजी घेऊन उपचार केल्यास रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी ,आयपीडी ,लसीकरण ,Delivery, एक्सीडेंट,  एमर्जन्सी इत्यादी रुग्णही बऱ्यापैकी असतात. तरी संशयित , सहवासीत  अशा रुग्णांनाच Antigen तपासणीसाठी जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पाठवावे हे विनंती.
प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा याठिकाणी येथील टेक्निशियन श्री संतोष खाकरे अविरतपणे Antigen तपासणी करत असून त्यांना सर्व आरोग्य कर्मचारी सहकार्य करीत आहेत. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास 108 रुग्णवाहिके द्वारे कोवीड सेंटर कडे नेण्याचे काम ड्रायव्हर श्री.मुळे व श्री नाईकवाडे अविरतपणे सेवा देत आहेत.