डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना औरंगाबाद
शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे ‘लेखणी बंद‘सुरुच
मंत्री महोदयासोबत बैठक होऊन तोडगा निघेणा
आ.सतीश चव्हाण यांची भेट
‘बामुक्टा‘चा जाहीर पाठिंबा
परीक्षा विभागासह सर्व काम ठप्प
*(औरंगाबाद--विवेक कुचेकर ): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघनेच्यावतीने सुरु असलेले ‘लेखणी बंद‘ आंदोलन अद्यापही सुरु आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत यांच्यासह अधिका-यांसोबत बैठक होऊनही सोमवारी (दि.२८) तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहणार आहे.
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयातील कर्मचा-यांनी गुरुवार पासून (दि.२४) लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. दुस-या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले असून परीक्षा विभागाचे काम पुर्णत: ठप्प झाले. मागण्या मान्य न झाल्यास १ ऑक्टोबर पासून ‘काम बंद‘ आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ.वैâलास पाथ्रीकर यांनी दिला आहे.
वेंâद्र व राज्यशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिप âारसी लागू करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला. राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक प्रवर्गासह सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. तथापि राज्यातील १४ विद्यापीठांचे कर्मचारी, अधिकारी अजूनही या आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत. या संदर्भात राज्यशासन, मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका पार पडल्या. मात्र सातव्या वेतन आयोगासह कर्मचा-यांची कालबध्द पदोन्नती व अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालये कर्मचारी संयुक्त कृती समिती स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीची गेल्या आठवडयात ऑनलाईन बैठक होऊन २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.तर एक ऑक्टोबर पासून सर्व कर्मचारी संपुर्ण काम बंद करुन संपात सहभागी होणार आहेत. राज्यशासन केवळ तोंडी आश्वासन देऊन कर्मचा-यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या भावना तिव्र बनलेल्या आहेत. या राज्यव्यापी आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे ४५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर फिजिंकल डिस्टसिन्ग ठेऊन कर्मचारी सहभागी झाले. कर्मचा-यासमोर महा संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.वैâलास पाथ्रीकर, संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात संघटनेचे सचिव प्रकाश आकडे, जीवन डोंगरे, अनिल खामगांवकर, महिला प्रतिनिधी डॉ.सुनीता अंकुश यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले. दरम्यान, आंदोलनाच्या तिस-या दिवशी कर्मचारी यांनी परीक्षेचे पुर्ण काम बंद केले त्यामुळे याचा परिणाम परीक्षावर होण्याची शक्यता आहे. दिवसभरात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.पुâलचंद सलामपुरे, डॉ.राहूल म्हस्के, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.उल्हास उढाण, अधिसभा सदस्य डॉ.स्मिता अवचार, डॉ.चव्हाण, डॉ.सुनील मगरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे आदींनी कर्मचा-यांची भेट घेऊन चर्चा केली. पाठिंबा देखील दिला यापुढेही सदर आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे.
‘बामुक्टो‘चा पाठिंबा
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघ बामुक्टो यांच्यावतीने शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. संघटनेचे नेते डॉ.विक्रम खिल्लारे, डॉ.मारोती तेगमपुरे, डॉ.उमाकांत राठोड, डॉ.दिलीप बिरुटे, डॉ.शेख शफी आदी उपस्थित होते. तसेच असोसिएशन ऑफ प्रिंसीप्लस अॅण्ड एज्युकेटर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.धनंजय वडमारे यांनी देखील भेट घेऊन लेखी पाठिंबा दिला. तर ‘एसएफआय‘च्यावतीने कर्मचा-यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आल्याचे लोकेश कांबळे यांनी घोषित केले.
मंत्र्यासोबतची बैठक निष्फळ
दरम्यान, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत यांनी सचिव, संचालक यांच्या समवेत सोमवारी (दि.२८) सकाळी बैठक झाली. तासभर विविध प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र तोडगा काही निघाला नाही. दोन महिन्यात मागण्या मान्य करु, असे मंत्री महोदय म्हणाले. तथापि शासन आदेश अथवा लेखी पत्र मिळाल्या शिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भुमिका कृती समितीने घेतली आहे.