वंचित बहुजन आघाडी आयोजित पोलीस फिटनेस कॅम्पचा आज समारोप 


(मुंबई--विवेक कुचेकर) कुर्ला, नेहरूनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा आज समारोप करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा लाभ सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला. 
या शिबिरामुळे पोलिसांचा फिटनेस समजण्यास मदत होणार आहे. अनेक पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बहुजन आघाडी कुर्ला विधानसभा स्वप्नील जवळगेकर यांच्या पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला होता.


'पोलीस नागरीकांसाठी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोना काळातही पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असून अशा परिस्थितीतही ते आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. अशा कठीण परिस्थितीत पोलिसांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे'. 
शिबिरासाठी नेहरु नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी सहकार्य केले. 


आरोग्य शिबिरासाठी हिलर थोरेपिस्ट - रमेश सिताराम मोहिते, राहुल कांबळे, विनित ठाकुर, तृप्ती मोरे , धमेंद्र राणे, गंगाधर माळी, हेमंत तांडेल, विकास संसारे यांनी पुढाकार घेतला.


वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला विधान सभेचे कार्यकर्ते-स्वप्निल जवळगेकर,अनिल मस्के,रोहित जगताप ,शैलेश सोनवने,अमोल पगारे, रोहित जवळगेकर, अभिजीत पगारे, प्रकाश पगारे, स्वयम सोनवने, संदिप वाघमारे, तेजस वाघमारे, सारीका जवळगेकर, सुप्रिया मोहिते उपस्थित होते.