कोरोना काळातही पूर्ण फी वसूल करणाऱ्या शाळेंचे 7 वर्षाचे आर्थिक ऑडिट करण्याचे शालेय शिक्षणमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आदेश....


 शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची   मुंबई रिजन मधील शाळा समस्या बाबत पालकांसोबत घेतली बैठक"


बेकायदेशीर फी वसुली करणाऱ्या सेंट जोसेफ शाळा संचालकांवर  फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश


बच्चूभाऊ यांनी पालकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या,शाळा मध्ये पालक सध्या विविध समस्यांना तोंड देत आहेत,-,200 मीटर अंतरावर स्कुल असेल तरी स्कुल बस फी ची सक्ती करणे,परिक्षेस बसू न देणे.शुल्क बाबत पीडीसी चेकची सक्ती करणे ,CBSE ,IB ,ICSE ,CISCE, IGCSE, बोर्डाच्या शाळा स्वतःला इंटरनॅशनल शाळा समजत असून आमचा राज्यसरकार सोबत संबंध नसल्याने आम्हाला राज्यसरकारचे नियम लागू नाहीत असे बोलने, आंदोलन करणाऱ्या पालकांच्या मुलांच्या ऍडमिशन रद्द करणे,विविध खर्चाच्या  (miscellaneous fees)नावावर फी अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल करणे,स्कुल प्रवेश फी ब्रेक अप न देने,, पूर्ण शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण नाकारणे,पुस्तके नाकारणे, संस्था चालकांची मनमानी, स्कुल बस फी घेणे, पालक संघांची स्थापना न करणे, विद्यार्थी दाखला न देणे,इत्यादी पालक समस्या आहेत. 


#राज्य शिक्षणमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले आदेश .....
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुंबई मधील शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना ज्यास्त फी घेणाऱ्या शाळांचे 7 वर्षाचे आर्थिक ऑडिट करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत,त्याचबरोबर ज्या सुविधा शाळा देत नाही त्या शुल्क वसुल करणाऱ्या शाळांना शुल्क कपात करण्याचे प्रस्ताव उपसंचालकांनी देण्याचे आदेश दिलेत. त्याचबरोबर शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्याना परीक्षेपासून वंचित न करण्याचे व online शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांना नोटीस पाठवून त्यांचे 7 वर्षाचे ऑडिट करण्याचे आदेश देत एकाही विद्यार्थ्याला परीक्षेत पासून आणि online शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी उपसंचालकांनी घ्यावी अन्यथा उपसंचालकांना मी सोडणार नाही असेही आज बच्चूभाऊ कडू यांनी तक्रारदार पालकांना उपस्थितीत सांगितले..  या बैठकीचे आयोजन प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष ऍड. मनोज टेकाडे व प्रहार जनशक्ती पक्ष  मुंबई संपर्क प्रमुख ऍड. अजय तापकीर यांनी केले होते, या बैठकीत पालक संघाचे अध्यक्ष जयंत  जैन, श्री. तुळस्कर, सुनील चौधरी,रविन्द्र पवार,महेन्द्र पवार,अतुल पवार,मनोहर चव्हान, उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क:
ऍड. मनोज टेकाडे (राज्य अध्यक्ष)9773273066
ऍड. अजय तापकीर (संपर्क प्रमुख) 9029237056
संतोष गवस (रायगड जिल्हा अध्यक्ष)+917738089666
महेश दाभोलकर(मुंबई अध्यक्ष) 7738752452
मयूर महाजन (ठाणे जिल्हा अध्यक्ष)+918669025424
प्रवीण खेडकर (नवी मुंबई अध्यक्ष)+918691999724
ई-मेल praharvs@gmail.com
प्रहार विद्यार्थी संघटना महाराष्ट्र
जीवजीत विश्वकर्मा
9619070928
प्रसिद्ध प्रमुख 
प्रहार जनशक्ती पक्ष मुंबई