बीड जिल्हा कोव्हीड रुग्णालयाचा आणखी एक बळी :-डा.गणेश ढवळें लिंबागणेशकर
------------------------(बीड प्रतिनिधी --विवेक कुचेकर )
दि. ३०/०८/२०२० रोजी बीड जिल्हा कोव्हीड रुग्णालयाने आणखी एक बळी घेतलाय. कांताबाई रघुनाथ ढास वय ३५ वर्षे , दोन मुलं, मोठा मुलगा ओंकार वय १८ वर्षं १२ वी.आणि मुलगी स्नेहा वय १३ वर्षे ७वी. यांना छातीत दुखु लागले म्हणुन सकाळी ६ वा. लिंबागणेश येथिल डॉ. सुदर्शन वाणी यांच्या "आई हास्पिटल मधे आणण्यात आले. त्यांनी तपासुन रक्तदाब कमी झाला आहे बीडला घेऊन जा असे सांगितले.
डॉ.कोकाटे आणि डॉ. जाजु यांनी तपासले परंतु दाखल करुन घेण्यास नकार, जिल्हा कोव्हीड रुग्णालयात रेफरल
------------------------------------------------------------------------------- रुग्णाला सकाळी ७:३० वा. बीड येथिल डॉ.कोकाटे यांच्या रुग्णालयात नेले ,त्यांनी तपासणीसाठी जिल्हा कोव्हीड रुग्णालयात जाण्यास सांगितले, नंतर लगेचच शिवकमल रुग्णालयात नेले येथिल वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले.
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू :- मयत कांता रघुनाथ ढास यांचा आरोप (मो.नं.९९६०५१३४९३)
------------------------------------------------------------------------------- सकाळी ८:३० वा. जिल्हा रुग्णालयात गेलो.तिथे अडमिट करून घेतले तर यानंतर आम्हाला डाक्टरांना वारंवार विनंती करूनही आक्सिजन लावण्यासाठी अर्धा तास लावला. तेथील डॉ. राऊत यांनी पेशंटला हात लावलाच नाही, कोरोना तपासणी रिपोर्ट आल्यानंतर बघु म्हणाले. दुपारी २ वाजता माझी पत्नी कांता माझ्या दोन मुलांना वा-यावर सोडुन देवाघरी गेली. परिचारीका धनी लक्ष दिले मात्र डाक्टरांनी उपचार केलेच नाहीत. दुर्लक्ष केले. त्यामुळे माझी पत्नी दगावली..
....
पालकमंत्री मुंडे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे या मुलांना त्यांची आई परत आणुन देणार आहेत काय?? डॉ.अशोक थोरात यांच्या विषयी वारंवार तक्रारी करूनही कारवाई करण्यात येत नाही, जिल्हा आरोग्य विभागाला दिलेल्या ३३ कोटी रुपयांमध्ये कोणाचा कीती वाटा आहे ??? याचाही तपास लागला पाहीजेत. आणखी ३५ कोटी देऊ म्हणणारे पालकमंत्री मुंडे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे दोघेही डॉ.अशोक थोरात यांच्यावर का मेहेरबान आहेत. विरोधी पक्षनेते असताना डॉ.अशोक थोरात यांना अवैध गर्भपातातील आरोपी, राजकीय हस्तक्षेप करणारा शासकीय पदाधिकारी म्हणून तात्काळ बदली करण्यात यावी असे पुराव्यासह मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी लेखी तक्रार करणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आजचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे डॉ.अशोक थोरात यांची पाठराखण का करत आहेत, हे कळायला मार्ग नाही......३३ कोटी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर.. ३३ कोटी काही संबंध आहे का ?? अशी आरोग्य विभागात चर्चेला उधाण आले आहे..