चौसाळा प्रतिनिधी- जगभरात थैमान घातलेल्या या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हतबल झाले आहे .याचा परिणाम शहरी भागामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे, व त्याच्या पाठोपाठ आता कोरोना हा ग्रामीण भागामध्ये आपले पाय रुजवण्यास सुरुवात करत आहे .चौसाळा या गावांमध्ये आतापर्यंत ४० ते ५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे .त्याचाच परिणाम चौसाळा व परिसरातील लोकांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. गावची बाजारपेठ खूप मोठी असून या पेठेमध्ये आसपासची तीस ते पस्तीस खेड्यांच्या लोकांची खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी रहदारी सतत असते ,यामुळे व्यापाऱ्यांकडे खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांचा व लोकांचा एकमेकांशी संपर्क हा जास्त प्रमाणात येतो, त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गावातील व्यापाऱ्यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा येथे दिनांक.१४/०९/२०२० ते दिनांक.१५/०९/२०२० वार -सोमवार, मंगळवार या दोन दिवशी मोफत अँटीजन टेस्ट चे आयोजन केले आहे. तरी गावातील व परिसरातील फळ विक्रेते ,कापड विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा विक्रेते व इतर सर्व व्यापाऱ्यांनी आपली अँटीजन टेस्ट मोफत करून घ्यावी. तसेच जर कोणाला सर्दी ,खोकला, ताप असे काही लक्षणे असतील, तर त्यांनी देखील ही अँटीजन टेस्ट करून घ्यावी, व या कोरोना संसर्ग रोगापासून स्वतःची व आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची या महामारी पासून सुटका करून घ्यावी. तसेच बाहेर कामानिमित्त फिरत असताना तोंडाला मास्क, रुमाल किंवा गमजा ,सॅनिटायझर इत्यादी चा वापर करावा. काम असेल तरच घराबाहेर पडावे ,अन्यथा फिरू नये ,व स्वतःची काळजी घ्यावी, व समाज ,देश , आपले गाव, कुटुंब या कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मदत करावी, असे आव्हान चौसाळा जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी केले आहे.