चौसाळा प्रतिनिधी- चौसाळा येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून ,आत्तापर्यंत लगबघ 40 ते 50 नागरिकांना कोरोना चा संसर्ग झाला आहे .चौसाळा व परिसरातील व्यापाऱ्यांची दिनांक 14 /9/ 2020 रोजी अँटीजन टेस्ट जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा येथे बीड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कासट व चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर खाकरे साहेब व त्यांची टीम यांच्यामार्फत अँटीजन टेस्ट करण्यात आली असून, त्या पैकी लगभग 428 व्यापाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली असून ,त्यामध्ये17 जण पॉझिटिव्ह आले आहेत व उर्वरित411 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच दिनांक .15 /09/ 2020 या रोजी अँटीजन टेस्ट केली असता ,त्यामध्ये 312 जणांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी 14 जण पॉझिटिव्ह आले आहेत. चौसाळा मध्ये दोन दिवसांमध्ये 740 लोकांची अँटीजन टेस्ट केली असून एकूण 31 पॉझिटिव रुग्णांचा आकडा समोर आला आहे. तसेच सद्यपरिस्थिती पाहता दिनांक 16/ 09 /2020 ते 20 /09/ 2020 या दिवसा पर्यंत संपूर्ण गावांमध्ये कडकडीत जनता कर्फ्यू लावण्याचे ठरवले आहे, तरी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे ,व नागरिकांनी सतर्क राहावे. आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी .चौसाळा येथे कोरोना चे मिटर हे वाढत आहे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. जर आपण नियमांचे पालन केले तर कोरोना पासून होणारा संसर्ग कमी होण्यास मदत होईल. यासाठी सर्वांनी सहकार्याने व एकजुटीने कोरोना ची साखळी तोडण्यासाठी लढले पाहिजे व नियमांचे पालन केले गेले पाहिजे, असे आव्हान जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी केले आहे.