दिवसा ढवळ्या मारलेल्या दाभोलकर,कलबुर्गी,पानसरे यांच्या खुनाचा तपास लागत नाही  पण सुशांतच्या मारेकऱ्यांची अक्खी कुंडली निघते, दुर्दैव  ......डॉ.जितीनदादा वंजारे


       सिनेअभिनेता सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण चांगलंच गाजल ,खूप दिवसापासून सामान्य पोलीस ते सी आय डी तपास चालू आहे प्रकरणाचा एक एक पैलू अगदी तंतोतंत शोधून काढला जातोय इथपर्यंत सगळं ठीक आहे.पण देशाचा सामान्य नागरिक या नात्याने मनात प्रश्न येतो की देशासाठी सर्वोच्च पणाला लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामाजिक काम करणारे थोर समाजसेवक या भारतातून अंधश्रद्धा दूर पळवून लावणारे समाज उद्धारक दाभोळकर,कुलबर्गी,पानसरे यांची हत्या दिवसाढवळ्या होऊनही त्यांची साधे मारेकरी सापडत नाहीत पण सुशांत राजपूत च सर्वकाही बाहेर येत याचा अर्थ काय ? हे मुद्दाम होऊन घडवलं जातंय काय ? कोणाचा तपास करायचा कोणाचा करायचा नाही हे ठरवणारे कोणी लुचे लफंगे तर नाहीत ना ? इन्वेस्टीगेशन एजन्सी तर कोणाच्या अधीन राहून काम करत नाही ना ? आशा नाना प्रश्नाचे काहून मनात येत आणि नेमकं आम्ही महान आहोत का ? आम्ही आमच्या  देशावर अफाट प्रेम करतो का ? आम्ही सर्व बांधव आहोत  एकमेकांना समानतेने वागतोत का ? आमच्या देशात समानता आहे का? देशसेवा,बंधुता,अधिराज्य,समानता,देशभक्ती,एकरूपता हे शब्द माझ्या देशात नावाला उरलेत ही लाज वाटण्याजोगी गोष्ट आहे.एखाद्या प्रकरणात पैसे मिळतात म्हणून मेलेली मढे उकरून काढायचे तपास लावायचा आणि मीडियाने टमकी वाजवयाची ही पद्धत आजकाल रूढ झाली आहे.जेंव्हा एखाद्या देशाची मीडिया एखाद्या सत्ताधारी  नेत्यांची गुलामी करते तेंव्हा तो देश रसातळला गेल्याशिवाय राहत नाही.आणि आज तिच परिस्थिती भारतात आहे.जनतेच देणंघेणं नसलेली काही टेलिव्हिजन मीडिया स्वतःच्या गुलामगिरीचा प्रत्यय द्यायला सुरु झालीय.एखाद्या गुलामाप्रमाणे सत्ताधाऱ्यांची बूट चटण्यात त्यांना स्वर्गसुख लाभताना दिसतंय या गुलामगिरीने देशाची पुरती वाट लागलीय हे बंद व्हायला पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
           एखाद्या अभिनेत्या ची आत्महत्या टेलिव्हिजन मीडिया चार चार महिने वाजवतो पण माझ्या शेतकरी बांधवाच्या  आत्महत्याला कोणी एक मिनिट दाखवत सुद्धा नाही.जे दाखवायला पाहिजे ते नाही दाखवत ,आमचा सैनिक सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आले तर ती खालच्या कोपऱ्यातील नोट असतें आणि अभिनेत्याचा  मुलगा काय खातो काय पितो याचा अंगडोम्ब करून टीव्ही मीडिया रिपोर्टर गळा फाडून सांगत असतें सबसे आगे,सबसे तेज,सबसे पहले,डंके की खबर,ब्रेकिंग न्यूज मध्ये सांगतात पण दलित अत्याचार,गरिबांचे शोषण,देश विक्री काढलाय सर्व जागेवर आरक्षण संपवण्यासाठी केलेला खाजगीकरण.मोठमोठ्या लोकांना कर्ज देऊन परदेशात पाठवले ,मोकाट वीजबिले आकारली जातात,दंगे ,जातीय तेढ,अन्याय अत्याचार इत्यादी गोष्टी घडवूनही मीडिया गप्प असते कारण यात चालू सरकार च अपयश दडलेल असत आणि ते झाकायच असत त्यामुळे समाजातील एक जागरूक घटक म्हंणून आपण सावध राहायला पाहिजे.सत्य असत्य पाहून आपण रीयाकट् व्हायला पाहिजे.
        एखादी अभिनेत्री गरोदर आहे ही जर नॅशनल मीडिया ची ब्रेकिंग न्यूज असेल तर तुम्हीच कल्पना करा या मीडिया वाल्यानी आपला देश कुठे नेउन ठेवलाय .एखाद्या अभिनेत्याने काय खाल्लं काय पिल त्याची मुलगा मुलगी टीव्ही वर ब्रेकिंग न्यूज प्रमाणे गरजतात पण आम्ही आंदोलन केल काय ? रस्त्यावर  उतरलो काय शासनाला न्याय मागितला काय ?कितीही ओरडलो तरी आमच कोणीच काहीच  एकत नाही.देशात अभिनेता कुटुंब ,गुंड मर्डर ,राजकीय नेता ची फोटोग्राफि,मंदिर,मस्जिद असे कुचकामी मुद्दे समोर आणतात आणि मुळमुद्दे बाजूला सारतात हिच खरी शोकांतिका आहे .रेल्वे मंडळ  विकली,विज महामंडळ विकली,शैक्षणिक बाजारीकरण,लो जीडीपी,नोकर भरती रद्द,वाढती बेरोजगारी,बँकेला लागलेली कुलूप,बंद पडलेल्या कंपन्या,कर्जबाजारी शेतकरी,शेतकरी आत्महत्या,महागाई,वाढता भ्रष्टाचार,ही महत्वाची व दाखवन्या  जोगी ब्रेकिंग न्यूज आहे  पण दुर्दैव आमच्या भारत देशाचे की, इथे पळून गेलेला विजय मल्ल्या,निरव मोदी ,नेता अभिनेता व अभिनेत्री यांच्या घरगुती  बातम्या ब्रेकिंग  दाखवतात आणि गरीब शेतकरी रोज मरतो आत्महत्या होतात ,सीमेवर सैनिक मारतात,उद्योग धंदा नाही,हाताला काम नाही,बेरोजगारी आहे यावर कोणी बोलत नाही .मीडिया पण पैशावर चालतो की काय अशी परिस्थिती आहे .नेमकं बोलणारे जर गप्प बसले तर देश रसातळाला जाईल यात तिळमात्र शंका नाही.सुशांत सुसाईड केस गेली दोन तीन महिने सारखी टीव्ही मीडिया दाखवते आहे आणि याला ईडी,सीआयडि व सर्वच यंत्रणा कसून तपास करत आहे ज्यातून निष्पन्न झालंय की तो सुशांत आणि ती रिया दोन्हीही बेवडे आणि गांजा कस होते.व इतरांना ही काही घातक द्रव्य पुरवत होते.आणि हिच गेल्या तीन महिन्यापासून ची आमच्या इथल्या नॅशनल मीडिया ची लॉकडाउन काळातील  ब्रेकिंग न्यूज आहे की जिच्यामुळे टीव्ही वाल्याना कोरोना महामारी,लो जीडिपी,पेट्रोल डिझेल दरवाढ,महागाई,बेरोजगारी,बंद पडलेले उद्योगधंदे,विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,कर्जबाजरीपणा,इतर देशाचे आक्रमन या सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहेत यावर एक चकार शब्दही कोणी बोलायला तयार नाही आणि हेच आमच्या देशाच खरं दुर्दैव आहे.
            प्रसंगीक लेखन
सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030