आरोग्य विभागाच्या वरीष्ठ आधिका-यांकडुन जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांची दिशाभूल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार:- डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर

आरोग्य विभागाच्या वरीष्ठ आधिका-यांकडुन जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांची दिशाभूल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार:- डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर
-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथिल कोविड रूग्णालयातील असुविधा, अपुरी यंत्रणा, कर्मचारी, वैद्यकीय तज्ञांचा अभाव, ऑक्सिजन बेडची संख्या याविषया विषयी आरोग्य विभागाच्या वरीष्ठ आधिका-यांकडुन जिल्हाधिकारी, पालकमंत्री बीड यांना चुकीची माहिती देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना लेखी तक्रार केली आहे, 


सविस्तर माहितीसाठी:-  अंबेजोगाई तालुक्यातील मौजे लोखंडी सावरगाव येथिल कोविड रूग्णालयातील ऑक्सिजन बेडची संख्या जिल्हाधिकारी ९९० तर पालकमंत्री १०६० सुसज्ज अवस्थेत तयार आहेत अशी प्रसारमाध्यमांना माहीती देताना केजच्या आमदार नमिता मुंदडा व नंदकिशोर मुंदडा मात्र केवळ ३५० ऑक्सिजन बेडची संख्या असुन त्या ठिकाणी वैद्यकीय तज्ञांचा अभाव, व्हेंटिलेटर वापरणारा कर्मचारी अपुरा आहे, तसेच अपुरी यंत्रणा आहे, रूग्णालयातील असुविधा याविषयी ना, राजेशजी टोपे, आरोग्यमंत्री यांना लेखी तक्रार केली आहे अशा बातम्या विविध विभागीय व स्थानिक दैनिकात प्रसिद्ध झालेल्या आहेत, 
      दररोज दैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या मध्ये बीड जिल्हा कोविड रूग्णालयातील असुविधा, तुंबलेले शौचालय,  बेसिन,अस्वच्छता, तसेच जिल्ह्यातील कोरोना सेंटर मध्ये रूग्णालयातील रूग्णांना निकृष्ट दर्जाचा आहार, वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या निष्काळजीपणा मुळे, कोरोना निगेटिव्ह रूग्णांना वेळीच उपचार न झाल्याने होणारे मृत्यू,  बीड जिल्हा कोविड रूग्णालयातील दाखल रूग्ण जेवणासाठी घरी जाऊन येणे, सुरक्षा रक्षक दारूच्या नशेत असणे, अतिदक्षता विभागाच्या ईमारतीत मोकाट कुत्र्यांचा वावर, कोरोना रूग्णांना रुग्णवाहिका वेळेवर येत नसल्याने होणारा त्रास, आणि याविषयी रुग्णांचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री बीड, आरोग्यमंत्री यांना केलेल्या ढीगभर तक्रारी आणि आरोग्य विभागाला मिळालेल्या ३३ कोटी रुपयांची खरेदी प्रकरणी मोठ्या प्रमाणावर अपहार झालेला असुन अव्वाच्या सव्वा किंमतीत जास्तीच्या वाढीव भावाने खरेदी दाखऊन प्रशासनाची व शासनाची दिशाभूल केली आहे त्याप्रकरणी उच्च स्तरीय कमिटीची स्थापना करण्यात यावी आणि चौकशी करून संबधित दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, आणि दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या विषयी गांभीर्याने विचार करून कठोर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री बीड, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केली आहे,