(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) :- स्वतःच्या कर्तत्वाने जेंव्हा एखादा माणूस उच्च पदावर पोहचतो आणि समाजात ज्यांच्या कार्याने स्वतःची,नातेवाईकांची व परिणामी समाजाची व राष्ट्राची मान उंचावते अशीच कामगिरी सध्या औरंगाबाद येथे राहणाऱ्या वर्षाराणी भगवानराव दिपके यांनी केली.प्राथमिक शिक्षण औरंगाबाद येथे घेऊन बी टेक चे शिक्षण औरंगाबाद येथील विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि येथून त्या पास आऊट झाल्या .स्वतःच प्राथमिक,माध्यमिक व उच्च पदस्थ असतानाही त्या एव्हढ्यावर थांबल्या नाहीत त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.त्यांचे वडील औरंगाबाद महानगर पालिकेत सहाय्यक अभियंता या पदावर काम करतातं.त्यामुळे टेकनॉलॉजि क्षेत्रातील भवितव्याबद्दल त्यांना विशेष मार्गदर्शन घरातच आपल्या वडिलांकडून मिळाले त्याच्या जोरावर त्यांनी पुढे शिक्षणाचा निर्धार केला आणि परीक्षा विशेष प्राविण्यासह पास करून त्या अमेरिका येथे पुढील मास्टर डिग्री साठी गेल्या पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी एम एस इलेक्ट्रॉनिक मध्ये अमेरिका येथे केले.तेथील सर्व परीक्षा व्यवस्थित पास होऊन त्यांनी विशेष गुणांनी त्या पास झाल्या आणि आज चांगल्या पॅकेज वर त्या अमेरिकेतील एका नामवंत कंपनी मास्टर इंजिनीरिंग येथे मुख्य अभियंता या पदावर काम करत आहेत.
शाहू फुले आंबेडकरी विचारांचे वारस असणारे हे दिपके कुटुंब वडिलांच्या अथक परिश्रमाने व डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी स्वतः परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले एका खेड्यातून चालू झालेला प्रवास आज एका मेट्रो सिटी पर्यंत त्यांनी आणून सोडला आणि एव्हड्यावरच न थांबता त्यांनी स्वतःच्या मुलीला इतके शिकवले की आज त्या अमेरिका सारख्या मोठ्या देशात एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत आहेत.त्यांनी स्वतःचे गुरु व आयडियल व्यक्तिमत्व परमपूज्य,महामानव, विश्वरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग समोर ठेऊन व त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ लक्षात ठेऊन अभ्यास केला आणि स्त्री-शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले व माता सावित्री फुले यांना त्याग समोर ठेऊन आपणही मोठे व्हावे समाजाचे ऋण फेडावे अशी शपथ घेऊन त्या प्रत्येक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आणि आज त्या मोठ्या पदावर काम करतात याचा त्यांना सार्थ अभिमान आहे आणि याच सर्व श्रेय त्या कुटुंबातील व्यक्तींना आई-बाबांना व त्यांचे आद्य गुरु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देतात.यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांचे,गुरूंचे व समाजाचे आभार मानले.
वर्षाराणी भगवानराव दिपके या सामान्य कुटुंबातील बौद्ध समाजातील मुलीने मिळवलेले यश भारावून टाकणारे आहे तसेच शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही प्रेरणादाई गोष्ट आहे.आणि त्यांच्या यशाबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.वर्षाराणी दिपके या बीड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या मोठ्या मामाची मुलगी आहेत.त्यांच्या या आभाळा एव्हढ्या यशामुळे संपूर्ण कुटुंबात हर्ष व आनंदाची लाट आली आहे.