माणूस एक समाजशील प्राणी आहे,समाजाशिवाय तो जगूच शकत नाही.समाजातील आपले ठिकाण पाहून तो पुढचे पाऊल उचलतो.समाजाचा विचार करून तो त्याच्या राहणीमानात बदल करतो.पशु आणी माणसात मोठे साम्य हे आहे की दोघेही सजीव आहेत पण फरक हा आहे की एकाला मर्जीने जगता येत आणी दुसऱ्याला पहिल्याच्या मर्जीने जगावं लागत.एकाला पिढ्यानंपिढ्याच कमवायचं असत आणी दुसऱ्याला आजच,आत्ताच या क्षणाच पाहायच असत.एकाला मायाजाल मध्ये गुरफुटून मरावं लागत तर दुसऱ्याला पहिल्याच्या हातून मरावं लागत.एकाला मतलबी,स्वार्थी,कष्टी पीडादायक जीवन जगावं लागत तर दुसऱ्याला बेफिकीर,त्यागी व समर्पणदायी असं समर्पक जीवन लाभत त्यामुळे ना त्याला मरणाची ना त्याला भविष्याची ना कशाचीही चिंता नसते आणी हाच त्याच्या आनंदाचा विषय आहे.
दिवस पावसाळ्याचे होते.आकाशी मेघ दाटले होते.नुकताच विजांचा कलकलाट चालू झाला होता.हवा स्वैरभरे वाहू लागली होती.वातावरण खवळले होते.पक्षी आपल्या आपल्या घरट्याकडे,आडोश्याला गेली होती.जंगल शांत व भयावह झाले होते.इतक्यात एक विज चमकली मोठा आवाज झाला तसा त्वेषेने इर्षेने पाऊस जमिनीकडे कोसळला.थंडगार हवा सुटली,विजांचा कडकडाट चालू झाला तसा थंडगार टपोरा पावसाचा थेंब झाडाची पणे सारवत एका गरोदर हरीणीच्या अंगाला भिडला.एकासोबत एक अशी पावसाची धार चालू झाली.विजांचा कडकडाट वाढत गेला आणी त्या भीतीने थरथरत एका हरिणीने स्वतःच्या पिलाला जन्म दिला.एक चिमुकल्या नाजूक पाडसाने एका भयान रात्री जन्म घेतला.हरिणीने अंग हलवले ते बाळ रप्पकन खाली पडले पावसामुळे ते थरथरत होते पण अशाही स्थितीत त्याला उठाव लागलं ,परिस्थितीशी सामना करावा लागला आणी त्या हिंस्र् स्वानाणे भरलेल्या जंगलात परिस्थितीशी दोन हाथ करण्यासाठी त्या पिल्लाने कंबर कसली आणी एका मिनिटात ते पाडस पाळायला लागल.मित्रानो ही नैसर्गिक क्रिया आहे ती निसर्गनियमानुसार चालते त्या हरिणीचे त्यागी कष्ट आणी त्या पाडसाचे समर्पण एका भयानक संकटाला तोंड देऊ शकल आणी याच बळावर त्यांनी स्वतःच जीवन चालू ठेवलं.म्हणून जीवनात त्यागाला आणी समर्पणाला खूप महत्व आहे.
एका श्रीमंत घरातील मुलगी जेंव्हा एखाद्या गरीब घरातील मुलाशी लग्न करते आणी त्यानंतर तिच्या वाट्याला येणाऱ्या समस्या आणी त्यातून त्रास सहन करून तिने सुधारलेली परिस्थिती आणी त्यातून उभा केलेला सुंदर असा संसार ही गोष्ट त्यागाने आणी समर्पणानेच होऊ शकते.तिने त्यागलेले वडिलांचे वैभव आणी समर्पनाणे उभा केलेला गरीब पतीचा संसार आणी त्यातून झालेला उद्धार हेच जीवनाचे मुळ आहे.आपल्याला भेटलेल्या बापाच्या गडगंज संपत्तीवर आयत्या पिठावर रेघुट्या मारणारे हल्ली खूप वाढलेत त्यांना कसलीही चाढ राहिलेली नाही मोकाट खाऊन उनाडक्या करत हिंडणं हेच त्यांची काम असतात पण स्वकर्तृत्वाने काहीतरी करून दाखवणे यात खरा पुरुषार्थ आहे असं मला वाटत.युवकांनी आत्ताच्या जगाच्या आधुनिक टेकनॉलॉजि चा योग्य वापर करून आपला विकास साधला पाहिजे.मोबाईल हे वेळ घालवण्याचे साधन झाले आहे ते आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर वापरायला पाहिजे अगोदर मुळ पाया मजबूत असणे गरजेचे आहे .अगोदर आपले शिक्षण महत्वाचे आहे आणी नंतर बाकीच्या गोष्टीना प्राधान्य द्यायला पाहिजे पण हल्ली मोबाईल व त्यातील काही अँप हे निव्वळ नुकसान कारक असून भारतातील युवा पिढी बरबादी चे मुळ कारण आहे.त्यापासून आपण दूर राहायला पाहिजे त्याचा त्याग करून आपला मार्ग शोधला पाहिजे असे मत डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
भगवान गौतम बुद्धांनी राजमहलाचा,शिशमहलाचा व राज वैभवाचा त्याग केला होता.बौद्ध धम्म जगाला देण्यासाठी अखंड आयुष्य एका राजपुत्राने जंगलात ते दिव्य ज्ञान प्राप्त करण्याच्या हेतूने घालवले ही त्यागाची आणी समर्पनाची समर्पक व्याख्या आहे.आणी हाच भगवान बुद्धाचा त्याग आज जगाला प्रज्ञा,शील,करुणा आणी शांतीचा,समतेचा व एकतेचा संदेश देणारा बौद्ध धम्म देऊन गेला आज जगात सगळीकडे त्यांची अनुयायी आहेत बौद्ध धम्म म्हणजे मानवी जीवन जगण्याचे अमूल्य विचार होय म्हणून बुद्ध म्हणतात मी देव नाही पण मार्गदाता नक्कीच आहे.आणी याच त्यांनी दिलेल्या अष्टांग मार्गाने प्रज्ञा शील करुणेचा अवलंब करून जीवन जगल पाहिजे तरच जगात शांती अबाधित राहील नसता एक दिवस अणुबॉम्ब च्या स्फोटात हे जग जळून खाक होईल यात शंका नाही.हे फक्त त्याग आणी समर्पण यामुळेच घडलं यात दुमत नाही.एखादा तुच्छ माणूस समाजाने बाजूला केलेला हिमालयात जाऊन त्याग करतो आणी साधू संत बनून येतो आपल्य…