खांदा कॉलनीत आरोग्य केंद्र उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रितम म्हात्रे यांची मागणी, पालिका आयुकताना दिले स्मरणपत्र  











पनवेल : खांदा कॉलनी शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाखांच्या घरात खांदा कॉलनीची लोकसंख्या असून येथे आरोग्य केंद्राची उभारणी करण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल महापालिकेकडे केली होती. वारंवार पत्रव्यवहार करून देखील खांदा कॉलनी शहरातील रहिवाशांसाठी कोणत्याही आरोग्य केंद्राची उभारणी प्रशासनामार्फत केली गेली नाही. त्यामुळे प्रशासनाने आरोग्य केंद्राची उभारणी करण्यासाठी प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात यावी अशा प्रकारचे स्मरणपत्र विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी आयुक्तांना दिले आहे.


                 खांदा कॉलनी शहर हे पूर्वीच्या नगरपरिषदेत समाविष्ट असलेले शहर आहे. या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. वारंवार पत्रव्यवहार करून देखील खांदा कॉलनी शहरातील रहिवाशांसाठी कोणत्याही आरोग्य केंद्राची उभारणी प्रशासनामार्फत केली गेली नाही. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव आरोग्य विभागाची तारांबळ उडालेली आहे. कोरोना चाचणी करण्याकरता येथील नागरिकांना ईतर आरोग्य केंद्रावर जावे लागत आहे. ईतर आरोग्य केंद्रात जाणे नागरिकांना खर्चिक आणि त्रासदायक ठरत आहे. शहरापासून जवळ असणाऱ्या आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने रुग्णांना रांगेत उभे राहून तासंतास वाट पहावी लागत आहे. त्यातच रांगेत एखादा कोरोना रुग्ण असल्यास नागरिकांना कोरोना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. येथे आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. खासगी वाहन करून इतर दवाखान्यात जावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.


              खांदा कॉलनी शहरात खांदेश्वर उद्यान सेक्टर 2 येथे स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांच्या नावे सुरू केलेले प्रशिक्षण केंद्र सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहे. याठिकाणी प्रशासनाने आरोग्य केंद्राची उभारणी केल्यास त्याचा फायदा खांदा कॉलनी शहर, मोठा खांदा गाव, आसुडगाव, आदई या गावांना होणार आहे. या ठिकाणी नवीन आरोग्य केंद्र झाल्यास नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आरोग्य केंद्राची उभारणी करण्यासाठी प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात यावी अशा प्रकारचे स्मरणपत्र विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी आयुक्तांना दिले आहे.  


 


खांदा कॉलनीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता येथे नवीन आरोग्य केंद्र उभारून नागरिकांचा त्रास वाचवावा. यासाठी पालिकेला पुन्हा स्मरणपत्र देण्यात आलेले आहे. - प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका






 

 




 

Attachments area