पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करण्याची मागणी, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा पुढाकार






पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पालिका हददित फिरते दवाखाने सुरू झाल्यास त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे.


                कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जेष्ठ  नागरिक, लहान मुले, स्त्रिया आणि गरोदर महिला यांना आरोग्य केंद्रापर्यंत येणे त्रासदायक तसेच धोकादायक ठरू लागले आहे. महानगरपालिकेने फिरते दवाखाने सुरू केले तर रुग्णांना उपचार घेणे सोयीचे होईल. कोरोना प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी या फिरत्या रुग्णालयाचा फायदा होणार याचा फायदा प्रशासनाला होईल. नागरिकांना जागच्या जागी उपचार उपलब्ध झाल्यास त्याचा प्रसार काही अंशी थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रात होणारी गर्दी ही कमी होईल तरी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.