जलव्यवास्थापनाचा उत्कृष्ट नमुना असणारी  ऐतिहासिक खजाना विहीर आता जलतरण तलाव, व्यायामशाळा झालीय :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ---------------------------------------------

-(बीड जिल्हा प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड शहराचे वैभव असलेली जलव्यवास्थापनाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक खजिना विहीर आता पर्यटन स्थळा बरोबरच व्यायाम शाळा व जलतरण तलाव बनु पाहतेय, सकाळच्या वेळी आसपासची बच्चेकंपनी तर याठिकाणी ट्युबवेल घेऊन पोहण्याचा आस्वाद घेताना तर काही मंडळी त्या ठिकाणी व्यायामाच्या साहीत्यासह व्यायाम करताना दिसतात.


सविस्तर माहितीसाठी:-
बीड शहरापासून जवळच ६ कीलोमीटर अंतरावरील दक्षिण दिशेला सोलापूर महामार्गावर ऐतिहासिक खजाना विहिर आहे.बालाघाटच्या पायथ्याला बिंदुसरा नदीकाठी  खजाना विहिर आहे.विहिरीची खोली फारशी  नसली तरीही खजाना विहिर चारशे वर्षात फक्त दोन वेळेस कोरडी पडली होती.जल व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहे.विहिरीचे बांधकाम पूर्णतः चौकोनी दगडी चि-यात आहे.चुना व दगड यांचाच वापर झाला आहे.विहिरीच्या तळाला अनेक चौकोनी खिडक्या आहेत.विहिरीच्या तळाला दोन बोगदेही आहेत.
खजाना विहिर हे एक ऐतिहासिक आश्चर्य असलं तरी ते वास्तव आहे.याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे.ऐतिहासिक वारसा जतनाची जागरूकता नसल्यामुळे खजाना विहिर समस्यांच्या विळख्यात अडकली आहे.