दिव्यांग निधीचे होणार वाटप, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या मागणीला यश


पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुमारे एक हजार हुन अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. या दिव्यांगाना दिव्यांग निधी वाटप करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी महापालिकेकड़े केली होती. प्रितम म्हात्रे यांच्या या मागणीला यश आले असून दिव्यांग निधीचे वाटप होणार असल्याचे पालिकेने प्रितम म्हात्रे याना कलविले आहे.


              विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी दिव्यांगाच्या राखीव निधीचे वाटप करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत पनवेल महानगरपालिका दिव्यांग विभागामार्फत मे 2020 मध्ये एकूण 1 हजार 136 दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 41 लाख 61 हजार 696 एवढा निधी वर्ग गेलेला आहे. 21 ऑगस्ट 2020 रोजी 1 हजार 130 दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 48 लाख 29 हजार नऊशे एवढा दिव्यांग कल्याण निधी वर्ग करण्याबाबतच्या प्रस्तावास महानगरपालिकेच्या आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. हा प्रस्ताव अंतिम कार्यवाहीसाठी लेखा विभागात पाठवलेला असल्याचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांना कळविले आहे.