डॉ.अशोक थोरात सूडबुद्धीचे राजकारण, साडे ४ घंटे तपासणी, वरीष्ठ पातळीवरुन फोन,  शेवटी हात हलवत माघारी :- डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर

डॉ.अशोक थोरात सूडबुद्धीचे राजकारण, साडे ४ घंटे तपासणी, वरीष्ठ पातळीवरुन फोन,  शेवटी हात हलवत माघारी :- डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर
-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) आज सकाळी बीड जिल्हा कोव्हीड रूग्णालयातील असुविधा, अस्वचछता, तुंबलेले शौचालय आदि प्रकरणी सोशलमिडीया व पत्रकारांच्या वाटस अप ग्रुपवर व्हिडिओ व फोटो टाकल्यानंतर दुपारी २ वाजता सुडबुद्धिने वरीष्ठ  आरोग्य विभागाच्या आदेशानुसार लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ रकटे यांच्यासह दोन कर्मचारी आणि लिंबागणेश पोलिस चौकी येथील जमादार सुरेश राऊत आणि जमादार सोनावणे, जमादार राख  यांनी व्हिडिओ शुटिंग सुरू करत दवाखान्यात प्रवेश केला.


वैद्यकीय अधिकारी यांना वरीष्ठ आधिका-यांचा फोन काहीतरी सापडतंय का बघा ??
-----------------------------------------------वैद्यकीय अधिकारी यांनी आम्हा दोघा डाक्टर दाम्पत्याचे रजिस्ट्रेशन व रिन्युएल तारीख तपासुन पाहीली, अगदी योग्य होती.
 वैद्यकीय अधिकारी यांनी २० बाय १२ च्या दोन रूमची तपासणी करण्यासाठी दुपारी २ ते साडे ६ वाजेपर्यंत साडे ४ घंटे तपासणी करत होत्या, वैद्यकीय अधिकारी तपासणी करुन घराच्या गेटच्या बाहेर पडल्यानंतर पुन्हा फोन यायचा अजुन काहीतरी सापडतंय का बघा, वैद्यकीय अधिकारी म्हणायच्या मी सगळं तपासणी केली काहीच सापडत नाही, तरी त्यांना ३ वेळा वापस यावे लागले, 


डोईफोडे औषध प्रशासन निरीक्षक :-
----------------------------------------------- औषध प्रशासनाचे निरिक्षक डोईफोडे यांचे सहकारी आल्यानंतर त्यांनी माझे रजिस्ट्रेशन बघितले,तुम्हाला ईमरजन्सी औषधे ठेवण्याचा अधिकार आहे, आणि तुमच्याकडे औषधं खरेदीची बिल आहेत, थोडिफार अनियमितता झाली आहे, विशेष गंभीर नाही.
त्यानंतर  काही कागदपत्रांवर सह्या घेऊन लायसन्स काढाण्याचा सल्ला दिला.


नेकनुर पोलिस ठाणे येथे जवाब घेतले,
वैद्यकीय अधिकारी डॉ.रकटे आणि औषध प्रशासन अधिकारी श्री. डोईफोडे यांचे समवेत नेकनुर पोलिस ठाणे येथे जाऊन जवाब घेतला.


आरोग्य विभागाची पोलखोल केली म्हणुन सुडबुद्धीने कारवाई:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------- सकाळी बीड जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील अस्वचछता याविषयी व्हिडिओ चित्रीकरण व फोटो सोशल मिडिया व पत्रकारांच्या वाटस अप ग्रुपवर पोलखोल केल्यामुळे व डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांना लेखी तक्रार ई-मेल द्वारे केल्यामुळे सुबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे.परंतु हा लढा थांबणार नाही.