उरण मधील हुताम्यांचे हौतात्म अबाधित राखायचे असेल तर शेतकरी कामगार , प्रकल्पबाधितांनी एकत्र येणे गरजेचे आहे . कामगार नेते महेंद्रजी घरत






. प्रतिनिधी खोपटे : सर्वांत औद्योगिक बाधित उरण तालुक्यातील युवापिढीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी , कामगारांचे न्याय हक्क प्रस्थापित करावयाचे असतील व खऱ्या अर्थाने स्व.लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचा संदेश “ हुतात्मांचे रक्त वाया जात नसते , वाया जाऊ दयायचे नसते " ... अबाधित राखयचा असेल तर चिरनेर जासई लढयातील हुतात्माच्या वारसा सांगणाऱ्या उरण पनवेल तालुकातील प्रकल्पग्रस्त शेकतरी , कामगारांनी एकजुटीने आपल्या न्याय हक्क प्रस्थापित करण्यासाठी लढले पाहिजे . असे उद्गार राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवर लाखो कामगारांचे नेतृत्वकरीत असलेले झुंजार कामगार नेते महेंद्र घरत यांनी ट्रान्सइंडीया कंपनीच्या गेटवरील न्यु मेरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या नामफलक अनावरण प्रसंगी काढले . यावेळी ते पुढे म्हणाले औद्योगिक करणाच्या नावाखाली उरण - पनवेल चा प्रकल्पग्रस्त आज नागवला गेलेला आहे . कारखानदारांनी अल्पदरात जमिनी संपादन करून स्थानिक युवकांना तुटपुंज्या पगारांच्या कंत्राटी नोकऱ्या देण्याचे कारस्थान केलेले आहे व आता DPD Corona च्या नावाखाली त्याही नोकऱ्यावरून आपणाला कमी करीत आहेत . शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने विकलेल्या जमिनी आज त्यांचे दर आम्हाला पोचलेले आहेत . आता आमची मागणी राहिली पाहिजे औद्योगिरीकरणाच्या जमिनी जर रहिवासी करून शेकडो कोटी रूपये कारखानदार मिळविणार असतील तर आम्हाला त्यामध्ये मालक म्हणून वाटा मिळाला पाहिजे अन्यथा आम्हाला जमिनीवर अवैधरित्या कब्जा करावा लागेल आणि अशी क्रांती घडण्याची वाट सरकार आणि औद्योगिक संस्थानी पाहू नये . या नामफलक अनावरण प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत , कार्याध्यक्ष पि.के.रामण , सरचिटणीस वैभव पाटील , जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी उपाध्यक्ष किरीट पाटील , विनोद म्हात्रे , मुरलीधर ठाकूर , परशुराम भोईर , जयवंत पाटील , संजय ठाकूर , त्याच बरोबर संघटनेचे संघटक अदिनाथ भोईर , लंकेश ठाकूर , प्राजल भोईर , अनंद ठाकूर , विवेक म्हात्रे , आदित्य घरत , राजेंद्र भगत , चंद्रकांत ठाकूर , योगेश रसाळ , सुजीत म्हात्रे , अजीत ठाकूर , आशिष ताडेंल , भरत पाटील , तसेच ऑलकार्गोचे कामगार उपस्थित होते .