ऐन पावसाळ्यात विकासाच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवणे म्हणजे बीड नगराध्यक्षांचा ईलाजच रोगापेक्षा भयंकर आहे, दैनिकात प्रसिद्ध बातम्यांनी फरकच पडत नाही:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) बीड शहरातील रस्त्यावरील खड्डे असो अथवा अस्वच्छता, घनकचरा, अथवा ईतर असुविधा, दैनिकात पानभर बातम्या जरी प्रसिद्ध झाल्या तरी त्यांच्यावर काहीही फरक पटत नाही, पावसाळ्यात रस्ते विकासाच्या नावाखाली खोदून ठेवले म्हणजे रोगापेक्षा ईलाजच भयंकर आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,
बीड शहरातील बकाल अवस्था कोट्यवधी रुपयांची कागदोपत्री कामे, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निदान यावर्षीतरी दुकानात, घरात पाणी शिरणार नाही या आशेने बीडकर नगराध्यक्षांनी दाखवलेल्या कागदोपत्री केलेल्या कामाकडे दुर्लक्ष करताना दिसतात मात्र सवयीमुळे म्हणा डॉ, नगराध्यक्ष थेट विकासाच्या नावाखाली रस्ते खांदायला सुरूवात करतात आणि पावसाळा संपल्यानंतर सुद्धा काम पुर्णत्वास जात नाही, खोदलेल्या रस्त्यावर चालताना बीड करांना तारेवरची कसरत करावी लागते, याविषयी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध होतात मात्र या प्रसिद्ध बातम्यांचा नगराध्यक्षांच्या मनावर काहीही परिणाम झालेला दिसून तरी येत नाही, बीडकर आपले गुलाम आहेत, दरवेळेस प्रमाणे यावेळी सुद्धा निवडून देतील त्यांना पर्यायच नाही या भ्रमात राहतात, एक दिवस तरी हा भ्रमाचा भोपळा बीडकर नक्कीच फोडतील