बीड पोलिसांचा देशपातळीवर गौरव करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षक बीड यांच्या मुख्यालयासमोर गटारीचे पाणी साचुन, दुर्गंधी, अस्वच्छता याविषयी दुर्लक्ष करणा-या नगराध्यक्ष आणि मुख्याधिका-यांचा  पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) बीड जिल्ह्यातील कोरोना काळातील विशेष कामगिरीमुळे बीड पोलिसांचा देशपातळीवर गौरव करण्यात आला, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च डेव्हलपमेंट कोविड १९ महामारी संघर्षात भारतीय पोलिसांची प्रमुख भूमिका या प्रकाशित पुस्तकात प्रत्येक राज्यातील पोलिसांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे, महाराष्ट्रातुन मुंबई , मालेगाव आणि त्यानंतर बीड पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख आहे, तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि टीमचा या माध्यमातून देशपातळीवर गौरव झाला आहे, पुस्तिकेतील पान नं १०९ वर तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि त्यांच्या टीमने कोरोना काळात कशा पद्धतीने काम केले याचा उल्लेख केला आहे, 
   याउलट याच कोरोनाच्या कालावधीत बीड नगरपालिकेने अस्वच्छता, रस्त्याच्या कडेला घनकचरा, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थाना समोर घाणीचे साम्राज्य, त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात घालणे, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील रस्त्यावरील खड्डे, त्या मध्ये साचणारे गटारीचे घाण पाणी, त्यामुळे पसरलेली दुर्गंधी यामुळे रहदारी करणा-या व पोलीस अधीक्षक कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरीकासोबतच पोलीस कर्मचारी यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे.


दैनिकात बातम्या प्रसिद्ध करून, सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी तक्रार करून नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका बीड यांच्यावर फरक पडतच नाही, मा, राजा रामास्वामी साहेब, आपण गांधीगिरी पद्धतीने नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका बीड यांना विशेष निमंत्रित करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा, कदाचित आपल्या यासत्कारामुळे नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी या्च्या वागण्यात फरक पडला आणि रस्त्यावरील खड्डे बुजून, रस्त्यावर गटारीचे घाण पाणी, अस्वच्छता, घनकचरा, याची व्यवस्थित विल्हेवाट लावली तर बरे होईल म्हणून आपणास लेखी विनंती करत आहे, याविषयी सविस्तर लेखी तक्रार मुख्यमंत्री , नगरविकास मंत्री, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना ईमेल द्वारे केली आहे,