मागण्या मान्य न झाल्यास उसतोड मजुरांची एक ही गाडी बीड जिल्ह्यातुन जाऊ देणार नाही--- प्रा शिवराज बांगर, मा. अनिल डोंगरे___

मागण्या मान्य न झाल्यास उसतोड मजुरांची एक ही गाडी बीड जिल्ह्यातुन जाऊ देणार नाही--- प्रा शिवराज बांगर, मा. अनिल डोंगरे________ 


 (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)ऊसतोड मजुरांचा प्रश्न हा वंचित बहुजन आघाडीच्या दारी आला आहे, आणी तो आम्ही या सरकारच्या कानी घेऊन गेलो आहोत पण हे सरकार जाणीवपूर्वक या मागणी कडे दुर्लक्ष करत आहे, पण या उसतोड मजुरांच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या सरकारला आव्हान करत आहोत बीड जिल्ह्यातुन उसतोड मजुराची एक ही गाडी इतर जिल्ह्यात जाऊ देणार नाही, या सरकारला आम्ही विनंती करत आहोत आपली दिवाळी गोड करणार्या उसतोड मजुरांच्या मागण्या मान्य करा, उसतोड मजुर जगला पाहिजे त्यांच्या अपेक्षा पुर्ण झाल्या पाहिजेत त्यांचे लेकर ही शिकले पाहिजे या साठी वंचित बहुजन आघाडी ताकदीनिशी लढेल व या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाहीत तो पर्यंत लढा चालुच अशेल,  बीड जिल्हा भर उसतोड मजुरांन सोबत बैठका चालु आहेत,मुजरांनी देखील ठाम भुमीका घेतली आहे जो पर्यंत प्रा शिवराज बांगर व अनिल डोंगरे यांचा आदेश एत नाही तो पर्यंत गाडीत बसणार नाहीत,आज पर्यंत आमचा आवाज कुनी बनला नाही पण डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु अॅड प्रकाश आंबेडकर साहेब हे उसतोड मजुरांचा आवाज बनले आहेत, या पुढे आम्ही उसतोड मजुरांच राजकारण होऊ देणार नाहीत, आणी सर्वच मुकादाम टॅक्टर मालक उसतोड मजुरांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आव्हाण करत आहोत आपल्या मागण्या मान्य झाल्या शिवाय रस्त्यावर गाड्या आणु नका, या सरकारच्या विरोधात आपण कोयता बंदचा इशारा देत आहोत त्यामुळे कोयता बंद आदोलंना मध्ये सर्वांनी सहभागी व्हा....