जियो जियो म्हणणारांची तोंड जिल्हा रुग्णालयातील असुविधा वैद्यकीय अनास्थेविषयी विलासकाकाच्या मृत्युबाबत  मुग गिळुन गप्पच राहिली :- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर

जियो जियो म्हणणारांची तोंड जिल्हा रुग्णालयातील असुविधा वैद्यकीय अनास्थेविषयी विलासकाकाच्या मृत्युबाबत  मुग गिळुन गप्पच राहिली :- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
----------------------------------------------- अन्नदुत विलासराव जाधव यांची जिवंत पणी भरपुर स्तुती करत दैनिकाचे रकाने जियो जियो नावाने भरणारी , फेसबुकवर" काका काळजी करू नका सर्वांचे आशिर्वाद आपल्या सोबत आहेत, आम्हा सर्वांना विश्वास आहे की आपण पुर्ण पणे बरे होऊन लवकरात लवकर घरी परत येणारच आहात, या लाकडाऊन मध्ये आपण पुर्ण कुटुंबाला सोबत घेऊन गोरगरीब कुटुंबांना घरपोच जेवण पोहोच केले आहे त्यामुळे त्या गोरगरीब कुटुंबांचा आशिर्वाद आपल्या सोबत आहे" अशी फेसबुकवर व दैनिकात पोष्ट करणारी जियो जियो म्हणणारी जिंदगी विषयी भरपुर लिहीणारांची तोंड आणि लेखणी अन्नदुत कै विलासकाकांचा वैद्यकीय अनास्थेमुळे झालेल्या मृत्युबद्द्ल चकार शब्दही न बोलता मुग गिळून गप्पच राहिली..हे विशेष महत्त्वाचे स्वत:च्या फायद्यासाठी आणि सोयीनुसार लेखणी चालवणारांची हि वास्तविकता आहे.


बीड जिल्हा रुग्णालयातील असुविधा आणि वैद्यकीय अधिकारी,परीचारीका, कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा मुळे होणा-या मृत्युबाबत स्वत:च्या नशिबाला दोष देत त्याविरोधात आवाज न उठवणारे, गप्प बसुन अन्याय सहन करणारांचीच संख्या जास्त आहे.एखाद दुसरा रघुनाथ ढास स्वत:च्या पत्नीच्या मृत्युबद्दल, एखादा बंकट जगदाळे वडीलांच्या मृत्युविषयी, एखादी मुलगीच आपल्या पापाविषयी  जिल्हा प्रशासनाला जाब विचारते आहे.... आणि न्याय मिळविण्यासाठी आम्ही लढाई तिव्र करण्यासाठी वचनबद्ध आहो