भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या पाटोदा तालुकाध्यक्षपदी हनुमंत धनवटे 


(बीड प्रतिनिधी)पाटोदा तालुक्यात सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गोरगरिबांच्या सुख दुखात सहभागी होणारे साईराम समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष हनुमंत भगवान धनवटे यांच्या कार्याची दखल घेत भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा,सुधीर अनवले यांच्या सुचनेवरून संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सहसचिव डॉ ,केशवदास वैष्णव महाराज यांनी केली आहे या निवडीबद्दल हनुमंत धनवटे यांना सर्वस्तरातुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत