तिर्थक्षेत्र कपिलधारचे पर्यावरण धोक्यात, वर्दीतील वृक्षप्रेमीसह बिजांकुर, वृक्षप्रेमींग्रुपच्या कौतुकास्पद उपक्रमावर पाणी, जिल्हाधिकारी मार्फत पर्यटन मंत्र्यांना तक्रार:- डॉ .गणेश ढवळे लिंबागणेशकर
-------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
बीड तालुक्यातील मौजे मांजरसुंबा ग्रामपंचायत अंतर्गत मन्मथ स्वामींच्या पावनभुमीत मंदिर परिसरातील बालाघाटच्या डोंगररांगात निसर्गप्रेमी, पर्यटन करण्यासाठी तसेच श्रावण महिन्यात यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात, याच बरोबर बिजांकुर वृक्षप्रेमींग्रुपच्या वतीने वृक्षलागवडीची मोठी चळवळ सुरू झाली आहे,मंदिर परिसरात नव्यानेच सुरू होत असलेले खडीक्रशर सेंटर मुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे या खडीक्रशरला मान्यता देण्यात येऊ नये यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री , पालकमंत्री बीड यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ कामास स्थगिती न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- तिर्थक्षेत्र कपिलधार मंदिर परिसरात नव्याने सुरू होत असलेल्या खडीक्रशरमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि भविष्यात पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी खडीक्रशरला मान्यता देण्यात येऊ नये अशी पर्यावरण, निसर्ग प्रेमींची मागणी आहे.
जिल्हाधिकारी यांनी कौतुक केलेल्या वर्दीतील वृक्षप्रेमी लक्ष्मण केंद्रे सह बिजांकुर वृक्षप्रेमींग्रुपच्या उपक्रमावर पाणी फिरण्याची शक्यता
----------------------------------------------- मांडवखेल येथे पाणी फाउंडेशनच्या शिवार फेरी कार्यक्रमात बीडचे जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांनी बीजारोपण, वृक्षलागवडीची पाहणी करताना वृक्षप्रेमी स.पो.नि.लक्ष्मण केंद्रे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले होते, १५ जुनला कुटुंबातील सदस्यांसोबत बीजरोपणाची मोहीम हाती घेतलेल्या सपोनि . लक्ष्मण केंद्रे यांनी अनेकांना मोहिमेचा भाग बनवत बिजांकुर वृक्षप्रेमींग्रुपच्या मदतीने मांडवखेल, रत्नागिरी, भंडारवाडी, कपिलधार, मांजरसुंबा येथील ओसाड माळरानावर ग्रामस्थांच्या सहकार्याने ७० हजार बिजांचे रोपण केले आहे, कपिलधार कडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा, नेकनूर बाजारतळ, ईदगाह मैदान, परिसरात वडाच्या फांद्यासह पिंपळ, चिंच या झाडांची लागवड केली आहे, या नव्याने सुरू होत असलेल्या खडीक्रशरमुळे पर्यावरण धोक्यात येऊन या सर्व उपक्रमावर पाणी फिरण्याची शक्यता आहे अशी वृक्षप्रेमींग्रुपकडुन भावना व्यक्त केली जात आहे
पर्यटनमंत्री, पालकमंत्री बीड यांना जिल्हाधिकारी मार्फत तक्रार:- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------
तिर्थक्षेत्र कपिलधार याठिकाणी यात्रेदरम्यान व इतर वेळी सुद्धा परराज्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात, बीड शहरातील पर्यटक सुट्टीत निसर्गरम्य वातावरणात फिरायला येतात, त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, आणि पर्यावरणाचा नाश होऊ नये म्हणून नव्याने सुरू होत असलेल्या खडीक्रशरला मान्यता देण्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी बीड तहसीलदार बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री ,पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार केली आहे