वयोवृद्ध श्रीमती इंद्राबाई वाळेकर यांच्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई व कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करून द्यावी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना लेखी निवेदन:- डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर


----------------------------------------------- (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)पाटोदा तालुक्यातील मौजे ढाळेवाडी येथील वयोवृद्ध इंद्राबाई लक्ष्मण वाळेकर यांचे शेतातील सोयाबीन, तुरीचे पिक अतिवृष्टीमुळे वाया गेले असून स्थळ पंचनामा करून नुकसान भरपाई  तसेच कर्ज मंजूर प्रकरण तात्काळ मंजूर करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी, शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया , पाटोदा यांना लेखी निवेदन दिले आहे, 


सविस्तर माहितीसाठी :- पाटोदा तालुक्यातील मौजे ढाळेवाडी येथील वयोवृद्ध इंद्राबाई लक्ष्मण वाळेकर यांचे पती अडीच वर्षापुर्वी निधन झाले, त्या एकट्या राहतात, ९० आर जमिनीवर गुजराण करतात, यावर्षी सोयाबीन व तुर पिकासाठी ३०-३५ हजार रुपये खर्च झाला, पिकही चांगले आले परंतु अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला, स्थळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.


वारसाहक्काने नविन कर्ज प्रकरण तात्काळ मंजूर करण्यात यावे:- योगेश ढवळे, शेतकरी सहकारी तथा बँक प्रतिनिधी ढाळेवाडी(मो, नं, ८६००४७८१२३) 
----------------------------------------------- इंद्राबाई लक्ष्मण वाळेकर यांचे पती लक्ष्मण वाळेकर मयत असुन २०१९ महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत लक्ष्मण बाबु वाळेकर यांचे कर्जमुक्ती योजनेत नाव असून आधार प्रामाणिकरण केलेले आहे, कागदपत्रे मिश्रा, शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लक्ष्मी चौक पाटोदा यांच्या कडे सादर केली आहेत, परंतु अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, तरी खरीप पीक कर्ज मागणी अर्ज बँकेत दाखल करण्यात आला असून कर्जमुक्ती लाभ मिळऊन देऊन त्यांना बँकेने नविन कर्ज प्रस्ताव मंजूर करून सहकार्य करावे, 


जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, शाखा व्यवस्थापक यांना निवेदन:- डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------          वयोवृद्ध श्रीमती इंद्राबाई लक्ष्मण वाळेकर यांच्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ईतर शेतक-यांना स्थळ पंचनामा करून  नुकसान भरपाई देण्यात यावी व नविन कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात यावीत यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार, कृषी अधिकारी, शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लक्ष्मी चौक पाटोदा यांना लेखी निवेदन दिले आहे.