जयहिंद उर्दू हायस्कूल बीड येथे मोहल्ला क्लीनिक आरोग्य शिबिराचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा --शेख निजाम 


(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) मागील जानेवारी महिन्यामध्ये भारतात कोरोनाविषाणू चा शिरकाव  झाला त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आला संपूर्ण भारतात व विशेषता महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली त्यामुळे सर्वसामान्य सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये कोरोनाविषाणू त्यासंदर्भात लहान सहान सर्दी खोकला आजाराबाबत मोठ्या प्रमाणामध्ये भय निर्माण झालेले आहे हीच बाब लक्षात घेऊन जमियात उलेमा हिंद अर्षद मदनी सत्य सेवा ग्रुप मालेगाव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात व बीड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोहल्ला क्लीनिक उघडून सर्वसामान्य लोकांच्या मनातून कोरोना विषाणू भय काढण्यासाठी सर्दी खोकला  वायरल  इत्यादी बाबत मोफत तपासणी करून औषध उपचार करण्याचे कार्य सुरू केलेले आहे त्यामुळे बीड शहरातील सर्वसामान्य जनताही लहान-सहान आजार हे अंगावर न काढता ते योग्य उपचार घेऊन भयमुक्त जगात आहे त्यामुळे मोहल्ला क्लीनिक च्या उपक्रमाला बीड शहरा मध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला असून बीड शहरातील तकिया मज्जिद, बालेपीर इंदिरा गांधी स्कूल, बार्शी नाका जिल्हा परिषद शाळा, इकरा उर्दू प्राथमिक शाळा इस्लामपुरा अरबी शाळा खासबाग याठिकाणी मोहल्ला क्लीनिक ची स्थापना करून आज पर्यंत बारा ते पंधरा हजार लोकांची लहानसहान आजारांची तपासणी करून योग्य ते औषध उपचार करण्यात आले यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामधील कोरोनाविषाणू बाबतचे भय निघत असून लोक उपयोगी असणाऱ्या या उपक्रमाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन आपला सहभाग नोंदवत असून त्याच अनुषंगाने बीड शहरातील मिल्लत नगर भागात जयहिंद उर्दू हायस्कूल बीड येथे मोहल्ला क्लीनिक उद्घाटन दिनांक  13 9 2020 रविवार रोजी बीड शहराचे माजी उपनगराध्यक्ष व समाजसेवक माननीय मोईनुद्दीन मास्टर ,फारुख पटेल ,जमियात उलमा हिंद चे मौलाना जाकिर , मौलाना बाकी  ,जयहिंद उर्दू हायस्कूल चे सचिव शेख निजाम यांच्या हस्ते होणार असून सदरील मोहल्ला क्लिनिक चा बीड शहरातील सर्व सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन इलियास टेलर रफिक नौशाद मिर्झा असद बेग मोमीन जुबेर अब्दुल हनान भाई शाकीर भाई  आदींनी केले आहे