मुर्दाड बीड करांच्या मनावर राज्य करणारे बीड भुषण" भारतभुषण", दक्ष नागरिक बीडकर ईतिहास जमा झाले काय??:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुर्दाड बीड करांच्या मनावर राज्य करणारे बीड भुषण" भारतभुषण", दक्ष नागरिक बीडकर ईतिहास जमा झाले काय??:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान असणारे भारतभुषण यांनी मुर्दाड बीडकरांची नस बरोबर ओळखली आहे, कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येतो, कागदोपत्री काम केल्याचे दाखवून निधीचा वाटा विधिवत ठरल्याप्रमाणे वाटून घेतला जातो, मुकाट्याने गुलामगिरीत जगणारे बीडकर आपल्या नशीबाला दोष देत निमुटपणे सगळं सहन करताना दिसतात.


भारतभुषण यांची बलस्थाने, वाटाघाटी करणारे विरोधक, निवडणुकीत   विकले जाणारे मतदार
----------------------------------------------- गेल्या ३० वर्षापासून विकासकामांच्या नावाने बोंबाबोंब असताना  कायम सत्तेत राहणाऱ्या भारतभुषण यांची बलस्थाने शोधली तर निवडणुकीत वाटाघाटी करणारे विरोधी पक्षनेते आणि खाण्यापिण्यावर निवडणुकीत विकले जाणारे मतदार हेच मुळ कारण दिसुन येते . 


नगरसेवक गुलामगिरी मानसिकतेचे प्रतिक, रबरी शिक्के
----------------------------------------------- बीड शहरामध्ये निवडणुकीत नेते, भांडवलदार, आणि नगरसेवक या त्रिकुटाची युती शहराच्या विकासाला मारक ठरत आहे, नगरसेवक पदासाठीचा अगदी नामांकन भरण्यापासुनचा निवडणुकीत लागणारा खर्च नेता भांडवलदाराला करायला लावतो, निवडणुकी नंतर भांडवलदार आणि नेते मंडळी संगनमताने कागदोपत्री काम केल्याचे दाखवून निवडणुकीत झालेल्या खर्चाची वसुली करतात, नगरसेवक मात्र लोकांनी नगरसेवक म्हणून मोठेपणा मिळावा आणि वेळप्रसंगी  वॉर्डातील कामे न केल्यामुळे लोकांच्या शिव्याशाप खाण्याच्या कामाचाच शिल्लक राहतोय.


  जशी प्रजा तसाच राजा या न्यायाने बीडकर, दुरावस्थेस जबाबदार, बुद्धिजीवी लोकांचे मौन जास्त घातक
----------------------------------------------- विविध दैनिकात बीड शहरातील अस्वच्छता, कचरा, रस्त्यावरील खड्डे, मुख्य रस्त्यावर अडथळा आणणारी मोकाट जनावरे, जागोजागी खोदलेले रस्ते याविषयी चकार शब्द काढताना दिसत नाहीत, आपल्याला काय करायचंय या मानसिकते बरोबरच आपण तक्रार करुन कशाला डोळ्यावर यायचं हि अनामिक भिती, असुविधांना कारणीभुत, आणि विशेष म्हणजे तथाकथित बुद्धीजीवी वर्ग या प्रश्नावर बोलताना दिसत नाही, हितसंबंध जपताना कटुसत्य मांडताना दिसत नाही.... 


ता.क.  वाचुन कोणाच्या भावना दुखावल्या असतिल किंवा नेत्याविषयी निष्ठावान आहोत असे दाखवताना मला ४ शिव्या हासडायच्या असतिल तर मोकळीक आहे पण ती  मनातल्या मनात... मला फरक पडत नाही...