डॉ.सुदाम मुंडे यांचे कर्मबंधु अवैध गर्भपातातील आरोपी डॉ.अशोक थोरात भाग २:-- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)डॉ.सुदाम मुंडे यांची पोलिसांना अरेरावी, तर अवैध गर्भपातातील आरोपी डॉ.अशोक थोरातांची तत्कालिन चौकशी अधिकारी यांना धमकी, गुंडागर्दी ,गौरी राठोड जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांची जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार
----------------------------------------------- दि. ०७ सप्टेंबर रोजी अवैध गर्भपातातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला अरेरावी केल्याचे ऐकले तेव्हा त्यांचे कर्मबंधु अवैध गर्भपातातील आरोपी डॉ अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांनी आरोपी असताना चौकशी समितीच्या अधिका-यांना केलेली दमदाटी, तत्कालिन पोलिस निरीक्षक, पोलिस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची लेखी तक्रार डॉ.गौरी राठोड तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय बीड यांनी केली होती.
सविस्तर माहितीसाठी :- केज तालुक्यातील डॉ.लामतुरे यांच्या अक्षदा हास्पिटल मधे झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सत्यशोधन करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती,सदर चौकशी समितीने दि. ०१/११/२०१२. रोजी त्यांचा अहवाल माझ्याकडे सादर केला होता व मी तो मान्य करून आपणाकडे सादर केला होता,या अहवालाच्या अनुषंगाने व मी दिलेल्या अहवालानुसार आपण संबंधित दोषी डाक्टरांवर प्रशासकीय कारवाई करण्याबाबत , प्रस्ताव मा. अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग,मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर केला.त्यानंतर पोलिस विभागाकडून यावर सखोल चौकशी झाल्यानंतर डॉ.लामतुरे व डॉ.अशोक थोरात यांच्यावर भादवि ३१२,३१५, ३१६ व १०९ नुसार गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली होती.ही कार्यवाही पुर्णतः पोलिस प्रशासनाकडून झालेली आहे, तरीही डॉ.थोरात हे वारंवार रुग्णालयात येऊन चौकशी समिती सदस्य यावर या ना त्या कारणावरून ४ ते ५ समर्थकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच पोलिस निरीक्षक, पोलिस अधीक्षक व माझ्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे याबाबत दबाव आणत आहेत, तसेच सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व डॉ.थोरात हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांना चौकशी समितीच्या अहवालावर त्रुटी काढण्याचा कींवा यावर खुलासा मागण्याचा अधिकार नाही, तसेच चौकशी समितीने दिलेला अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी यांनी स्विकृत केलेला असल्याने यावर भाष्य करणं उचित होणार नाही असे चौकशी समिती सदस्यांनी कळवलेले आहे.तरी आपण योग्य ती कारवाई करण्यात यावी.
संदर्भ:-जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय जिल्हा रुग्णालय बीड
(जा.क्र./जिरूबी/९५९०/१३ दि. ०४/०६/२०१३)
चौकशी समिती सदस्यांची जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी तक्रार
----------------------------------------------(- संदर्भ :- दि. २८/०३/२०१३ जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांना चौकशी समिती सदस्य यांनी चौकशी समिती अहवाल व त्यातील त्रुटी सादर करणेबाबत लिहिलेले पत्र)
जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांना लेखी पत्रामध्ये चौकशी समिती सदस्य डॉ. आर.यु.राठोड, डॉ.आर.एच.गिरी, डॉ.व्ही.एल.जाधव, डॉ.पी.व्ही.बडगिरे यांनी लिहिलेल्या पत्रात कळवले आहे,या प्रकरणा मध्ये सर्व बाजुंनी अनावश्यक पत्रव्यवहार डॉ.थोरात व त्यांचे केज येथिल समर्थक व विरोधक यांच्याकडुन होत आहे, यापुर्वी डॉ.थोरात यांनी आम्हाला या प्रकरणात कायदेशीर नोटीस देऊन१०० दक्षलक्ष रुपयांचा दावा दाखल करण्याबाबत कळविले होते अशा नोटीस किंवा अनावश्यक पत्रव्यवहार करणे म्हणजे चौकशी समितीवर दबाव आणण्यासारखे आहे, डॉ.थोरात व त्यांचे ४-५ समर्थकांकडून वारंवार जिल्हा रुग्णालयात येऊन चौकशी समितीतील सदस्यांना व प्रशासनातील ईतर कर्मचा-यांना धमकी देणे,दबाव टाकणे, शिवीगाळ करणे, धुडगूस घालणे ईत्यादी प्रकार सातत्याने चालु आहेत, तरी आपल्या स्तरावरुन असे प्रकार थांबविण्यासाठी आपण जिल्हाधिका-यांना विनंती करावी.