डॉ.अशोक थोरात यांची डॉ.सुदाम मुंडेवर कारवाई म्हणजे दरोडेखोराची चोरावर कारवाई, जिल्हाधिकारी उघडा डोळे बघा नीट ,, मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांना लेखी तक्रार :- डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
------------------------------------------------ (बीड जिल्हा प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड डॉ.अशोक थोरात यांच्यावरील गुन्हे तेच आहेत जे डॉ.सुदाम मुंडेवरील आहेत, आणि त्यांच्या वरील आरोप उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आरोप कायम केलेले आहेत, त्यांनी आज अवैध गर्भपातातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे यांच्यावर कारवाई करणे हास्यास्पद असून दरोडेखोराकडून चोरावर कारवाई करण्यात यावी असा प्रकार आहे, आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार डॉ.अशोक थोरात यांनी केलेल्या अवैध गर्भपात प्रकरणी कारवाई का करत नाहीत हा प्रश्र्न पडला आहे, विशेष म्हणजे डॉ.अशोक थोरात विरोधातील सर्व गुन्ह्याचे पुरावे तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि आजचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना दिलेले आहेत.
सविस्तर माहितीसाठी:- डॉ. सुदाम मुंडे यांनी अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी जी भा.दं.वि.कलमे यांच्यावर आहेत तीच कलमे भारतीय दंड विधानाच्या ३१२ ,३१३,३१४,३१५ तसेच एम.टी.पी.एक्ट.३,५
कलमानुसार डॉ.अशोक थोरात यांना अटक करण्यात आली होती.
डॉ.अशोक थोरात यांच्यावरील आरोप
----------------------------------------------
जिल्हा बीड, तालुका केज , FIR/procecding/G.D.NO.182/2012 दि. ३०/०९/२०१२
दोषारोपपत्र क्रमांक ६६/२०१५ दि. १३/०४/२०१५
भा.द.वि.३१२,३१५,३१६,१०९
एम.टी.पी.एक्ट.१९७१ कलम ३,४,५
आरोपीचे संपूर्ण नाव डॉ.अशोक संपतराव थोरात वय ४२ वर्षे , राहण्याचे ठिकाण केज,
अटक दिनांक ०९/१२/२०१२
रिमांड दिनांक ०९/१२/२०१२ एमसीआर.
डॉ.अशोक संपतराव थोरात, तत्कालिन वैद्यकीय अधिक्षक वर्ग क्रमांक १ उपजिल्हा रुग्णालय केज यांनी यातील पिडीत महिला ही गर्भपात करणार असल्याची पुर्व कल्पना असताना देखील व यातील आरोपी डॉ.चंद्रकांत बाबुराव लामतुरे हे त्यांच्या अधिनस्त जिल्हा रुग्णालय केज येथे वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत होते,व त्यांच्याकडे शासनमान्य गर्भपात केंद्र नाही,त्यांना गर्भपात करण्याचा अधिकार नाही,व एमटीपी कायद्याच्यानुसार १२ आठवड्याच्या पुढील कालावधीच्या गर्भपातासाठी दोन डाक्टरची गरज असते.जे तेथे उपलब्ध नाहीत,त्यांच्या कडे रक्तपेढी नाही, सदर डॉ.लामतुरे यांना गर्भपाताबाबत तांत्रिकदृष्ट्या पुरेसे ज्ञान नाही,या गर्भपातामुळे सदर महिलेच्या जिवीतास धोका होऊ शकतो हे माहीत असुनही सदर महिलेस किंवा तिच्या सोबतचा हनुमंत बसवर (यातील आरोपी)या व्यक्तिस कुठलीही अचुक माहिती न देता दि. २९/०९/२०१२ रोजी डॉ.लामतुरे यांच्याकडे गर्भपातासाठी पाठवले व पाळत ठेवली तसेच स्टींग आपरेशन करीता योग्य प्रणालीचा वापर न करता संबंधित स्त्रीच्या गोपनियतेचा भंग केला, यावरुन यातील आरोपी डॉ.अशोक संपतराव थोरात यांचे हे कृत्य गुन्ह्यातील कलम ३१२, ३१५,३१६ भादवि सह कलम३,४,५ एमटीपी एक्ट १९७१ प्रमाणे दोषारोपपत्र आहे.
यातील डा.अशोक संपतराव थोरात यांची पीडित महिला शोभा बाबुराव सावंत( आशाबाई बसवर)यांची त्यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडीया पुढे दिलेल्या जबाबाची सीडी पोलिस स्टेशन केज येथे ठेवण्यात आलेली आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांची मुख्य निवडणूक आयुक्त व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना लेखी तक्रार
----------------------------------------------
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना पुराव्यांसह दि. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी लेखी तक्रार करून डॉ.अशोक थोरात हे अवैध गर्भपातातील आरोपी असून या प्रकरणी त्यांना अटक झाली होती,त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, आणि डॉ.अशोक थोरात यांच्या वरील आरोप उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आरोप कायम केलेले आहेत.तसेच शासकीय सेवेत असताना राजकारणात सक्रिय सहभाग आहे असे नमूद करून विधानसभा निवडणूकीपुर्वी त्यांची बीड जिल्ह्यातुन तात्काळ बदली करण्यात यावी अशी लेखी तक्रार दाखल केली होती.
मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांना लेखी तक्रार :-डां.गणेश ढवळे लिंबागणेशकर
------------------------------------------------ डॉ. सुदाम मुंडे यांना अवैध गर्भपातातील आरोपी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया म्हणजे दरोडेखोराकडून चोरावर कारवाई करण्यात आली असा प्रकार आहे, याप्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांना लेखी तक्रार दाखल करून डॉ.अशोक थोरात यांच्या वर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.