बीड नगरपालिकेला महिलांसाठी शौचालय बांधण्याची आवश्यकताच वाटत नाही, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्र्यांना लेखी तक्रार

बीड नगरपालिकेला महिलांसाठी शौचालय बांधण्याची आवश्यकताच वाटत नाही, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्र्यांना लेखी तक्रार:- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर

-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) बीड शहरातील नगररोड वरील निर्माणाधीन शौचालय बांधकाम केवळ पुरूषांसाठी व्यवस्था नसुन महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबणा होत असून याप्रकरणी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 

सविस्तर माहितीसाठी:-  

नगररोड वरील शौचालये बांधकाम हे केवळ पुरूष वर्गासाठी असुन महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नाही, बीड शहरातील धानोरा रोडवरील, चंपावती शाळेसमोर, पंचायत समिती समोर, निलकमल हॉटेल शेजारी, तसेच सध्या भाजी मंडई भरत असलेल्या बसस्थानका मागील बायपास रोडवरील निर्माण होत असली शौचालये केवळ पुरूष वर्गासाठी व्यवस्था केलेली आहे, नगररोड वर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, न्यायालय, आदि शासकीय कार्यालये आहेत, याठिकाणी पुरूषांसोबत महिलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळे याठिकाणी पुरूषांसोबत महिलांची व्यवस्था करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्तांना लेखी तक्रार केली आहे