(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)या जमाती आदिवासीच्या हक्कदार आहेत परंतु या समाजाचे आमदार-खासदार नसल्यामुळे यांचे प्रश्न सभागृहात कोणीही मांडत नाहीत ज्यांना आम्ही मत देतो ते सभागृहांमध्ये आमचे प्रश्न का उपस्थित करत नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून माझ्या प्रिय समाज बांधवांनो आपण आदिवासी चे खरे हक्कदार आहोत आपणास ही लढाई लढावी लागेल कारण आपल्याला वाली कोणी नाही.
एकत्र येऊन आदिवासी चा लढा यशस्वी करून घेऊ कारण तो आपला हक्क आणि अधिकार आहे त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन मुळ भटक्या-विमुक्त या 42 जातीच्या लढा आपल्याला ऊभा करावा लागणार आहे आपण यांना मते दिली.या व्यवस्थेने काय दिले आपल्याला या राज्यकर्त्याने आपल्याला आदिवासीच्या हक्कापासून जाणून-बुजून वंचित ठेवले आहे आपली अवस्था आहे तशीच आहे काही सुधारणा झाली नाही पण आपल्या मताच्या जोरावर ही राजकीय मंडळी मोठी झाली आहेत फक्त निवडणुकी मध्ये मतदाना पुरती भटके-विमुक्त आठवतात निवडून आले की पाच वर्षे आपल्या कडे फिरकत सुद्धा नाहीत जे आपल्या समाजाचे नेते आहेत ते फक्त मालकीच्या पुढे मागे करून स्वतः ची पोळी भाजून घेतात व समाज वार्यावर व समाजाच्या नावावर मोठे होतात आपण मात्र आहो तिथेच आहोत त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे खाली दिलेल्या आम्ही मुळ भटक्या विमुक्त आदिवासीच आहोत आम्हाला जाणून बुजून डावले आहे कारण आदिवासी च्या मतदारसंघात वाढ होईल हे यांना नको आहे आपण आदिवासी आहोत आणि संविधानाने दिलेला तो अधिकार आहे तो आपल्याला मिळवायचा आहे 42 जमातीतील बांधवांनी एकत्र यावे आपले प्रश्न सोडून घेऊ या असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते भटके-विमुक्त समाजाचे नेते खंडू जाधव यांनी केले आहे
भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र
विमुक्त जाती--अ
~~~
१) बेरड २) बेस्तर ३) भामटा ४) कैकाडी ५) कंजारभाट ६) बंजारा ७)पालपारधी ८) राजपारधी ,गावपारधी,हरणी शिकारी,९) राजपुत भामटा १०) रामोशी ११) वडार १२) वाघरी १३) छपरबंद मुस्लिम धर्मीयांसह
भटक्या जमाती,-- ब
~~~~
१) गोसावी २) बेलदार ३) भराडी ४) भुते ५) चित्रकथी ६) गारुडी ७)लोहार ८) गोल्ला ९) गोंधळी १०) गोपाल ११) मेळावे १२) जोशी १३) काशीकापडी १४) कोलाटी १५) मैराळ १६) मसनजोगी १७) नंदीवाले १८) पांगुळ १९) रावळ २०) शिक्कलगर २१) वैदू २२) वासुदेव २३) भोई २४) बहुरूपी २५) ठेवणारी २६) ओतारी२७) मरी आईवाले , कडकलक्ष्मी वाले, मरगम्मावाले..
असे आवाहन भटक्या विमुक्त समाजाचे नेते मा.खंडू जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केले आहे