सरकारने खाजगी कोविड सेंटरला मान्यता देताना पोलीस, पत्रकारांना १० टक्के बेड आरक्षित करणे बंधनकारक करावेत, मुख्यमंत्री,गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांना निवेदन:- डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
महाराष्ट्र राज्यातील पोलीस कोरोना योद्धा व पत्रकारांच्या कोरोनामुळे होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता व त्यांचे योगदान पाहता सरकारी रुग्णालया बरोबरच खाजगी रुग्णालयांना कोविड सेंटरला मान्यता देताना पोलीस प्रशासन व पत्रकारांना १० टक्के आरक्षित बेड बंधनकारक करण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बीड, उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या मार्फत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन दिले आहे .
सविस्तर माहितीसाठी :- महाराष्ट्र शासन खाजगी रुग्णालयात महात्मा फुले योजने अंतर्गत आजारावरील उपचारांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देत असते, या कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्ती कालावधीत नैतिक जबाबदारी म्हणून ज्या रूग्णालयात कोविड सेंटरला मान्यता द्यायची असेल त्यांना पोलीस प्रशासनातील आधिकारी कर्मचारी आणि पत्रकारांचे सामाजिक योगदान पाहता त्यांच्यासाठी १० टक्के बेड आरक्षित असणे बंधनकारक करण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना लेखी निवेदन डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते आणि शेख युनुसभाई च-हाटाकर यांनी दिले आहे
डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर,
शेख युनुसभाई च-हाटाकर