तहसिल प्रशासनाने बालाघाटावरील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ स्थळपंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, मुख्यमंत्री, कृषीमंत्री ,ग्रामविकास मंत्री,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड,विभागीय आयुक्त यांना निवेदन- डॉ, गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------- (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड तालुक्यातील बालाघाटावरील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ तहसिल प्रशासनाने स्थळपंचनामे करावेत व नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणी बरोबरच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे
सविस्तर माहितीसाठी:- बीड तालुक्यातील बालाघाटावरील मौजे लिंबागणेश या गावासह पंचक्रोशीतील ईतर गावांमध्ये अतिवृष्टी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, सोयाबीन, मका, बाजरी, कोबी फळभाज्या, आदि, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, परंतु जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन सुद्धा तहसिल प्रशासन स्थलपंचनामे करण्याबाबत उदासीन दिसुन येते, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
ओला दुष्काळ जाहीर करावा, मुख्यमंत्री , कृषीमंत्री , ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्तांना निवेदन:- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------- अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान पाहता, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना करण्यात आली आहे,