कसं कसं घडलं उरण !




 कसं कसं घडलं उरण !"चं प्रकाशन

 

      

 

उरण दि 26(विट्ठल ममताबादे)   

           कोकणातील सुप्रसिध्द साहित्यिक रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या " कसं कसं घडलं उरण " या पुस्तकाचं प्रकाशन समर्थ दास मेघशाम भगत यांच्या शुभहस्ते झाले

प्रा.एल बीचे हे 33 सा वे पुस्तक आहे.

        या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त

करताना रायगडभूषण प्रा.एल.बी.म्हणाले की "उरण तालुका हा मागील 25/30 वर्षात प्रचंड वेगाने बदललेला आहे.जुन्या पिढीलाही हा बदल आश्चर्यजनक वाटत आहे आणि आजच्या नव्या पिढीला भूतकाळ  न अनुभवल्यामुळे तो चकचकीत केवळ आनंद घेत आहे. त्याला आणि येणा-या पिढ्यांना मागचही  वैभवशाली उरण आजच्या बदलात दाखवायचे आहे".

 

 

कोरोनाच्या दिवसात कौटुंबिक वातावरणात देखणा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी गंधार पाटील,धर्मेन्द्र कडू,विनय तांडेल,संगीता भगत,श्रेया तांडेल इत्यादींनी लेखकाला सदिच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन भैरवी पाटील यांनी केले आणि कविलेखक गुंजार पाटील यांनी आभार मानले.