विवेक कुचेकर यानी अडवला ऊसतोड मजुराचा टॅम्पो


(बीड प्रतिनिधी)आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या संपुर्ण महाराष्ट्रात  कोयता बंद आंदोलनाच्या पार्शवभुमीवर व  स्वाभीमानी बीड जिल्हाध्यक्ष प्रा,शिवराज बांगर पाटील यांच्या  आदेशाने आज उसतोड कामगार  मुकादम व वाहतुकदार यांचा टॅम्पो बीड ऊस्मानाबाद जिल्हा हद्दीवरती पकडुन त्यांना बालाघाटचे नेते  विवेक कुचेकर,गेवराईचे किशोर भोले,लिबांगणेशचे गणेश वीर यांनी  आक्रमक भुमिका घेवुन सदरील मुकादम टोळीस जाब विचारण्यात आला व  हा टेम्पो परत जळगाव याठीकाणी पाठविण्यात आला यापुढे  प्रा,शिवराज बांगर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकही गाडीच काय तर एकही कोयता बीड जिल्हयातुन बाहेर जाणार नाही असा सज्जड दम देखील  देण्यात आला याबाबत स्वीस्तर माहीती अशी की,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व  बीड जिल्हाध्यक्ष प्रा शिवराज बांगर पाटील ,अनिलजी डोगंरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्रात कोयता बंद आंदोलन हेत असुन या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत
 मजुरांना २५० ग्रॅम साखर दररोज मोफत द्यावी, नोंदणीकृत संस्थेमार्फत कोटा गाडी मुकादम यांची नोंद करावी, मंडळाकडे तोडणी मजूर कामगार व वाहतूकदारांना प्रोविडेंट फंड, ग्रॅच्युईटी, विमा व वैद्यकीय सुविधा हक्कांच्या शैक्षणिक सवलती लागू कराव्यात, ऊस तोडणी दरात प्रत्येकी चारशे रुपये टन करावा व वाहतुकीच्या दरात वाढ करावी, मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ करावी, पद्मश्री विखे-पाटील विमा योजनेअंतर्गत प्रत्येक तोडणी व कामगार वाहतूकदारांचा मुकादमाला प्रत्येकी पाच लक्ष रुपये मोबदला मिळावा, बैल जोडीला एक लक्ष रुपये तसेच बैलगाडी व सोबत असलेल्या गाई म्हशी कालवडी वगार यांचाही विमा भरावा, विम्याचा हप्ता प्रीमियम ५० टक्के रक्कम कारखाना व ५० टक्के रक्कम राज्य सरकारने भरावी, या व  इतर मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेच्या वतीने  वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा,शिवराज बांगर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण बीड जिल्हयात कोयता बंद आंदोलन करण्यात येत असुन याच पार्श्वभुमीवर आज बीड ऊस्मानाबाद सरहद्दीवरती वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका नेते विवेक(बाबा)कुचेकर यांनी जळगाव येथील ऊसतोडणी मजुराचा टेम्पो अडवुन महाराष्ट्रात होत असलेल्या कोयता बंद आंदोलनाची माहीती देवुन सदरील टेम्पोस जळगाव येथे परत पाटवुन दिले