वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण. 

 

 

उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत बांधापाडा, खोपटेच्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत हद्दीतील नाना नाणी पार्क येथे नारळाची झाडे लाऊन वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमा प्रसंगी उद्योगपती देवेंद्र पाटील, सुगंधा कोळी (महिला विभाग अध्यक्ष), कलावती घरत (महिला गाव अध्यक्ष भाजपा),परेश ठाकूर (युवा विभाग अध्यक्ष), मिलक्षी म्हात्रे (ग्राम. सदस्या),देवानंद पाटील (ग्राम.सदस्य),अचुत ठाकूर (ग्राम.सदस्य), संदेश म्हात्रे (ग्राम.सदस्य), प्रशांत ठाकूर (चिरनेर पंचायत गण अध्यक्ष भाजपा), हेमंत ठाकूर (युवा गाव अध्यक्ष), भूपेंद्र ठाकूर, परेश पाटील, विष्णु पाटील, रुपेश ठाकूर, योगेश म्हात्रे, सूरज ठाकूर, तुषार पाटील, भावेश ठाकूर व ग्रामस्थ उपस्थित होते.अत्यंत शांत संयमी,कर्तृत्ववान ऍक्टिव्ह सरपंच म्हणून विशाखा ठाकूर यांची ओळख आहे. थेट महिला सरपंच म्हणून निवडून येण्याचा मान विशाखा ठाकूर यांना सर्वप्रथम मिळाला आहे. मनमिळावू व सर्वांना सोबत  घेऊन, सर्वांमध्ये मिळून मिसळून त्या काम करतात, आपल्या ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी अनेक विकासकामे केली या विकास कामांवर तेथील जनताही समाधानी आहे . स्वच्छ व पारदर्शक असा त्यांचा कारभार आहे त्यामुळे समाजात त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन चांगला आहे. त्यांच्या सर्व कामात, अडीअडचणीत त्यांचे पती भाजपचे पदाधिकारी प्रशांत रमेश ठाकूर हे त्यांना नेहमी मार्गदर्शन  करतात.अश्या या कर्तृत्वान महिला सरपंच विशाखा ठाकूर यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमाद्वारे मोठया उत्साहात साजरे करण्यात आला.