उरण दि.30 (विठ्ठल ममताबादे )
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) युनीट मे. न्यु ट्रान्सइंडिया लॅाजिस्टीक प्रा. लि. ( ॲाल कारगो) या संघटनेच्या युनियनच्या नामफलकाच्या बोर्डाचे अनावरण व उद्घाटन सोहळा मे. न्यु ट्रान्सइंडिया लॅाजिस्टीक प्रा. लि. ( ॲाल कारगो) मु. खोपटे, ता. उरण, नवी मुंबई येथे RMBKS युनियनचे पदाधिकारी, सर्व कामगार सभासद, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला.
नामफलक उदघाटन प्रसंगी कामगार नेते राज्य उपाध्यक्ष - संतोषभाई घरत, रायगड जिल्हा अध्यक्ष- गणेश पाटील,
कॅान्टिनेंटल कंपनी युनिट कार्याध्यक्ष - अच्युत ठाकुर, सचिव - वासुदेव ठाकूर, खोपटे गावचे सामाजिक कार्यकर्ते- प्रशांत ठाकूर, बहुजन क्रांती मोर्चा उरण संयोजक - अक्षय ठाकूर आणि सर्व कामगार वर्ग उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी आपले मत व्यक्त करताना कंपनी कामगारांना त्रास दिला तर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीने भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। असा इशारा RMBKS रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी कंपनी प्रशासनाला दिला. "कामगार वर्गांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ कटिबद्ध असून आम्ही कामगारांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. कामगारांना पगार वाढ असो, बोनस, निवृत्ती नंतर वरसांना नोकरी असो अशा समस्या उदभवल्या तर कंपनी विरोधात राज्य पातळीवर आंदोलन छेडले जाईल.संघटनेच्या माध्यमातून कोणावरही, कोणत्याही कामगारावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन कामगार नेते, राज्य उपाध्यक्ष - संतोषभाई घरत यांनी नामफलकाच्या अनावरण प्रसंगी केले.